Buldana Election News Agrowon
ॲग्रो विशेष

Grampanchyat By-Election In Washim : वाशीममध्ये ५५ ग्रामपंचायतींसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक

वाशीम तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचा समावेश असून २९ ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे, मालेगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या १० ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे व एक रिक्त सरपंच पद आहे.

Team Agrowon

Washim News : राज्य निवडणूक आयोगाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/ थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी (By-election) ग्रामपंचायत निवडणुकीचा (Grampanchyat Election) कार्यक्रम घोषित केला आहे.

जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतीच्या एकूण ९२ रिक्त सदस्यांसाठी आणि पाच रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी येत्या १८ मे रोजी मतदान होणार आहे.

वाशीम तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचा समावेश असून २९ ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे, मालेगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या १० ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे व एक रिक्त सरपंच पद आहे.

रिसोड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सहा सदस्यांसाठी, मंगरूळपीर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या ११ सदस्यांसाठी आणि एक सरपंच पदासाठी, कारंजा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या १५ रिक्त सदस्यांसाठी आणि एक सरपंच पदासाठी आणि मानोरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या २१ सदस्यांसाठी आणि दोन सरपंच पदासाठी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून या पोट निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर केला आहे. यात १८ एप्रिलला तहसीलदार हे निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

२५ एप्रिल ते दोन या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी तीन या कालावधीत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे, तीन मे रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल.

आठ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

१८ मे रोजी सकाळी साडेसात वाजेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. १९ मे रोजी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: राज्याला गारपीट, अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Chhatrapati Sambhajinagar ZP Budget: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’चा ७.४३ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्प

Chhatrapati Sambhajinagar Politics: भाजपने मित्र म्हणत केसाने गळा कापला

Agri Success Story: कुटुंबाने उभारली यशाची गुढी

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

SCROLL FOR NEXT