Bullock Cart  Agrowon
ॲग्रो विशेष

Bullock Cart Race : पुणे जिल्ह्यात बैल गाडा शर्यतीवर बंदी ; जिल्हा प्रशासनाचे आदेश

Lumpy Virus : पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली व मुळशी तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Swapnil Shinde

Lumpy Skin Disease : राज्यभरात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांमध्ये संसर्ग झाला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून पुणे जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित आहे. त्यामुळे जनावरांची वाहतूक, खरेदी-विक्री व्यवहार आणि बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यभरात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांमध्ये संसर्ग झाला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून पुणे जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित आहे. त्यामुळे जनावरांची वाहतूक, खरेदी-विक्री व्यवहार आणि बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात एकीकडे पावसाने पाठ फिरवली असताना दुसरीकडे जनावरांमध्ये लम्पी आजाराने डोके वर काढले आहे. अकोला, नांदेड, सातारा यांच्यासह अनेक जिल्ह्यांतील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, आता पुणे जिल्ह्यातही जनावरांमध्ये लम्पीचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपूर्ण पुणे जिल्हा लम्पी चर्म रोगासाठी ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्याचे आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली व मुळशी तालुक्यातील जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जनावरांची वाहतूक, शर्यती, जत्रा भरवणे, प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

तसेच जनावरांची खरेदी विक्री करताना किमान २८ दिवसापूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोग्य दाखला बाजार समितीस सादर करणे बंधनकारक राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT