BPCL and NSI MOU Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production Sweet Sorghum : गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीसाठी बीपीसीएल आणि राष्ट्रीय साखर संस्थेत करार

National Sugar Institute : गोड ज्वारीला इथेनॉलचा स्त्रोत म्हणून विकसित करण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत पेट्रोलियम साखर संस्थेला ५ कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेनं दिली आहे. त्यामुळे भविष्यात गोड ज्वारीचा इथेनॉलसाठी वापर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dhananjay Sanap

BPCL and National Sugar Institute Sign MoU : गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीसाठी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेत (एनसीई) करार करण्यात आला आहे. गोड ज्वारीला इथेनॉलचा स्त्रोत म्हणून विकसित करण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत पेट्रोलियम साखर संस्थेला ५ कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेनं दिली आहे. त्यामुळे भविष्यात गोड ज्वारीचा इथेनॉलसाठी वापर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी साखर, गुळाचं सीरप आणि मक्याच्या वापरासाठी मान्यता दिलेली आहे. मागील वर्षभरात इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर वाढवण्यात आला आहे. परंतु तरीही २० टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला यश आलेलं नाही.

२०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पर्याय अवलंबविले जात आहेत. परंतु केंद्र सरकार गोड ज्वारीच्या इथेनॉलचे दर जाहीर करत नाही. त्यामुळे गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्माण करणाऱ्या कारखान्यांची कोंडी होते. परिणामी शेतकरी गोड ज्वारीच्या लागवडीला पसंती देत नाहीत, असं शेतकरी सांगतात.

देशातील कच्चा तेलाची आयात कमी करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी हालचाली करण्यात येऊ लागल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली आहे.

त्याउलट साखरेचा इथेनॉलसाठी वापर दिवसेंदिवस वाढत आहे. इंडियन शुगर मिल्स असोशिएशनच्या अंदाजानुसार, चालू वर्षात १४.१ लाख टन साखर इथेनॉलसाठी वळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ८.३ लाख टन साखरेचा वापर इथेनॉलसाठी करण्यात आला होता. परंतु चालू वर्षात मात्र त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

गोड ज्वारी कमी पाण्यात आणि जास्त उष्णतेत तग धरून राहणारं पीक आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. परंतु गोड ज्वारीची मूल्यसाखळी विकसित न झाल्याने शेतकरी गोड ज्वारीला पसंती देत नाहीत.

गोड ज्वारीपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. विविध संस्थांनी त्यावर संशोधन करून झाले आहे. परंतु त्यावर भर देण्याऐवजी आजवर साखरेपासून इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यात आले, असं जाणकार सांगतात.

दरम्यान, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेच्या करारात गोड ज्वारीच्या लागवडीपासून इथेनॉल निर्मितीसाठी गुंतवणूक केली आहे. तसेच गोड ज्वारीतून इथेनॉल निर्मितीनंतर चोथ्याचा वापर खत आणि पशुखाद्य म्हणून करण्यासाठी देखील संशोधन करण्यात येणार आहे, असल्याचं राष्ट्रीय साखर संस्थेनं सांगितलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Student Travel: शिक्षणासाठी पाच लाखांवर मुलांचे ‘अप-डाउन’

Bogus Voter List: मतदार यादीत घोळ, मात्र आयोग कारवाई करणार नाही : पवार

Turmeric Rate: हळदीच्या दरावरील दबाव कायम

Banana Rate: हंगामी फळांची आवक वाढली, केळी दरांना फटका

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

SCROLL FOR NEXT