Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : नुकसानीचे पंचनामे न केल्यास मतदानावर बहिष्कार

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पालघर जिल्ह्यात थैमान घातले असून मंगळवारी (ता. २२) दहाव्या दिवशीही पाऊस थांबायला तयार नाही.

Team Agrowon

Wada News : मॉन्सूनोत्तर पावसाने पालघर जिल्ह्यात थैमान घातले असून मंगळवारी (ता. २२) दहाव्या दिवशीही पाऊस थांबायला तयार नाही. यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

नुकसानीला १० ते १२ दिवस उलटूनही आतापर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी अथवा शेतीचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केलेले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे वाडा कृषी अधिकारी हरीश मकर यांनी सांगितले,

मात्र पालघर आणि भिवंडी तालुक्यात पंचनामे सुरू झाले, मग वाड्यात दुर्लक्ष का, असा तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त सवाल केला आहे.

कुडूसचे माजी उपसरपंच ईरफान सुसे यांनी अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त करून येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने कापलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT