Farmers' Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers' Protest : मोदी सरकारला शेतकऱ्यांची धास्ती; दिल्लीकडे जाणाऱ्या सीमा सील, इंटरनेट सेवाही बंद

Delhi Border Seals : गेल्या दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर पंजाबसह देशभरातील शेतकऱ्यांनी धडक दिली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी लढा दिला होता. जो सुमारे ३७८ दिवस चालला होता. यानंतर सरकारने माघार घेत ते कायदे मागे घेतले होते. आता हमीभावाच्या कायद्यासह इतर मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने (अराजकीय) दिल्लीकडे कूच केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : येत्या काही महिन्यातच देशात लोकसभा निवडणूकांच्या रणधुमाळीस सुरूवात होणार आहे. याच्याआधी केंद्रातील मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. हमीभावाच्या कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी एकवटा आहे. तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात (अराजकीय) शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने 'दिल्ली चलो'चा नारा दिल्याने शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. यापार्श्वभूमिवर हरियाणा पोलिसांनीही ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी करत दिल्लीकडे जाणाऱ्या सीमा सील केल्या आहेत. तर हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे.

दोन वर्षांपूर्वी देशातील शेतकऱ्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात रणशिंग फुकले होते. तसेच तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले होते. यानंतर आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी हमीभावाच्या कायद्यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीवर कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. तसेच शेतकरी दिल्लीच्या सीमेपर्यंत देखील येऊ नयेत यासाठी सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. सरकारने याबाबत खबरदारी घेत हरियाणा पोलिसांच्या मदतीने दिल्लीकडे जाणाऱ्या सीमा सील करण्यास सुरूवात केली आहे.

अंबाला, हरियाणा सीमा सील

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर हरियाणा-पंजाब सीमेवर परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनली आहे. यावरून सरकारने सीमा सील करत हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच हरियाणा पोलिसांनीही ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे. तसेच पंजाब-हरियाणा सीमेवर शंभू सीमा सील करण्यात आली आहे. सीमेवर बीएसएफ आणि आरएएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

सीमेवर नाकाबंदी

तसेच पंजाब ते जिल्ह्यातल्या सर्व मार्गांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर फतेहाबादमधील रतिया आणि जाखल भागात येणाऱ्या सीमेवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. तर राज्याचे पोलीस महासंचालक पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून यास्थितीवर डीजीपी स्वतः लक्ष ठेवून आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू

राज्यातील जाखळमध्ये दोन दिवसांपासून रस्त्यांवर काँक्रीटचे ब्लॉक टाकण्यात आले आहेत. तर रतीया परिसरात मुख्य रस्त्यांवर एकप्रकारे नाकाबंदी करून रस्ता रोखण्यात आला आहे. पंजाबमध्ये जाण्यासाठी लोक आता फक्त लहान गावांचा मार्ग वापरत आहेत. फतेहाबाद परिसरातही हंसपूरसह प्रमुख ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. तर जिल्हाभरात कलम १४४ ही लागू करण्यात आला आहे.

जाखलाचे पोलीस छावणीत रूपांतर

शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्याने जाखल जिल्ह्याचे पोलीस छावणीत रूपांतर झाले आहे. येथे सीआरपीएफ च्या ३, एसएसबी आणि एचएपीच्या प्रत्येकी १ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या या तुकड्या येथे गस्त घातल आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मायोंद चौकीजवळ सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स ठेवण्यात आले आहेत. तर पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे म्हणणे आहे.

शांततेने आंदोलन करावे

यावर "शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आम्ही शंभू सीमा सील केली आहे. जेव्हा ते (शेतकरी) येथे येतील तेव्हा आम्ही त्यांना यापुढे न जाण्याची विनंती करू. त्यांना यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यांनी शांततेने आंदोलन करावे आणि येथून निघून जावे, अशी विनंती करू असे डीसीपी अर्शदीप सिंह म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT