Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Nursery Management : नियोजन भात रोपवाटिकेचे...

Paddy Cultivation : दर्जेदार उत्पादनासाठी रोपवाटिकेपासूनच भात रोपांचे योग्य व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे. भात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व संकरित भात जातींचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्यांस बीजप्रक्रिया अवश्य करावी.

Team Agrowon

Paddy Crop Management : भात हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक म्हणून ओळखले जाते. मात्र विविध कारणांनी भात उत्पादनात मोठी घट येते. भात पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन कमी येण्यामागे सुधारित लागवड पद्धती आणि पीक व्यवस्थापनाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. त्यासाठी रोपवाटीका करण्यापासून ते पीक काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

पूर्वमशागत

जमिनीची उत्पादन क्षमता व सुपीकता ही जमिनीच्या भौतिक जैविक व रासायनिक गुणधर्मांवर अवलंबून असते. त्यामुळे वेळेवर मशागत करणे गरजेचे आहे. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते.

हिरवळीची खतांचा वापर

जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक आहे. भात पिकांमध्ये ताग व धैंचा या हिरवळीच्या पिकांचा खत म्हणून वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यासाठी हिरवळीची पिके जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरून पीक फुलोऱ्यात आल्यावर चिखलणीवेळी जमिनीत गाडावी. त्यानंतर भात रोपांची पुनर्लागवड करावी. हिरवळीचे पीक हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीतील नत्राचा पुरवठा वाढवते.

सुधारित वाणांचा वापर

भात लागवडीसाठी सुधारित जातींचे प्रमाणित बियाणे वापरावे. सुधारित वाणांमध्ये कमी उंची, पीक न लोळणे व खतास उत्तम प्रतिसाद देणे ही वैशिष्ट्य आहेत.

बियाणे खरेदी

भात पिकाच्या सुधारित किंवा संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून किंवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना,

बियाणे मान्यताप्राप्त व योग्य त्या प्रकारचे असल्याची खात्री करावी.

बियाण्याच्या पिशवीवर लेबल व सील असल्याची खात्री करावी.

लेबल वर संबंधित अधिकाऱ्याची सही असावी.

बियाणे खरेदी केल्यानंतर पावती घ्यावी.

लेबलवर बियाण्याची जात, प्रकार, लॉट नंबर, उगवण शक्ती, आनुवंशिक शुद्धता बियाणे, वापराची अंतिम तारीख यांचा उल्लेख असल्याची खात्री करावी.

बियाणे प्रमाण

भात पेरणी अंतर, जाती परत्वे, बियाणे वजन, आकारमान यावरून बियाणे प्रमाण कमी जास्त होते.

१००० दाण्यांचे वजन १४.५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी बारीक जातीसाठी ः १५ बाय १५ सेंमी अंतरावर १५.५ किलो, तर २० बाय १५ सेंमी अंतरावर २० किलो बियाणे प्रति हेक्टरी.

मध्यम दाणे, १००० दाण्यांचे वजन १४.५ ग्रॅम पेक्षा जास्त आणि २० ग्रॅम पेक्षा कमी असेल, तर हेक्‍टरी २५ ते ३० किलो बियाणे पुरेसे होते.

मध्यम जाड जातीच्या बाबतीत १००० दाण्यांचे वजन २० ते २५ ग्रॅम असेल तर हेक्टरी ३५ ते ४० किलो बियाणे लागते.

जाड जातींसाठी १००० दाण्यांचे वजन २५ ग्रॅम पेक्षा जास्त असेल तर ४० ते ४५ किलो प्रति हेक्‍टरी बियाणे लागते.

संकरित जातींसाठी हेक्‍टरी २० किलो बियाणे.

बीजप्रक्रिया

तीन टक्के मिठाचे द्रावण ः १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून त्यात भात बियाणे बुडवावे. त्यानंतर पाण्यावर तरंगणारे हलके बी काढून नष्ट करावे. भांड्याच्या तळाशी राहिलेले जड बी २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक व जिवाणूनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता, आभासमय काजळी नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे.

कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या जिवाणूनाशकाचा वापर शिफारसीप्रमाणे करावा. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो याप्रमाणे किंचित ओलसर करून प्रक्रिया करावी. बियाणे बारदानावर सावलीत अर्धा तास सुकवून नंतर पेरणी करावी.

महत्त्वाच्या बाबी

प्रथम बुरशीनाशकाची त्यानंतर जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.

बीजप्रक्रियेवेळी बुरशीनाशके व कीटकनाशके जिवाणू खतात मिसळू नयेत.

बीजप्रक्रिया करताना बियाणाची साल व टरफल निघणार नाही याची काळजी घ्यावी.

खरेदी केलेल्या बियाण्यांवर बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केली असल्यास, फक्त जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.

रोपवाटिका तयारी

रोपवाटिकेत भाताची पेरणी २५ जूनपर्यंत १ ते १.२० मीटर रुंद व ८ ते १० सेंमी उंच गादीवाफ्यावर करावी. गादीवाफे तयार करणे शक्य नसेल, तर रोपे तयार करण्यासाठी थोडी उंचवट्याची जागा निवडावी. त्याच्या चारही बाजूंनी खोलगट सरी काढावी. त्यामुळे जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होतो.

एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते.

वाफे तयार करताना एक आर क्षेत्रास २५० किलो शेणखत, युरिया १ किलो याप्रमाणे मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी.

जोमदार रोप वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी १ किलो युरिया प्रति आर क्षेत्र या प्रमाणे द्यावे.

लावणी लांबणीवर पडली, तर प्रति आर क्षेत्रातील रोपास १ किलो युरिया द्यावा.

एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी.

बियाणे पेरणीनंतर १५ दिवसांनी, क्विनॉलफॉस (पाच टक्के) १५ किलो किंवा दाणेदार क्लोरपायरिफॉस (१० टक्के) १० किलो प्रति हेक्टर प्रमाणात जमिनीत मिसळावे.

नत्रयुक्त खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू नये. त्यामुळे करपा रोग वाढतो.

भात खाचरांचा आकार मर्यादित ठेऊन बांधबंधिस्ती करावी.

रोपवाटिकेतील वाफ्यात खोडकिडींसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत.

रासायनिक फवारणी (प्रमाण : प्रति १० लिटर पाणी)

करपा आणि पर्णकरपा रोग ः कार्बेन्डाझिम किंवा किंवा पेनकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल १० ग्रॅम/ मिलि

करपा रोग ः ट्रायसायक्लॅझोल १० ते १५ मिलि अधिक स्टिकर १० मिलि

- डॉ. तुकाराम भोर ९४२२५६०१४२

(कृषी संशोधन केंद्र,वडगाव मावळ, जि.पुणे)

भाताचे सुधारित वाण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: पैशाचे सोंग आणता येत नाही

Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र

Water Rate Extension: पाण्याच्या दरनिश्चितीला मुदतवाढ

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT