Paddy Harvesting
Paddy HarvestingAgrowon

Paddy Harvesting : उन्हाळी भातशेती कापणीला वेग

Paddy Farming : सध्या ढगाळ वातावरण आणि पावसाची चिन्हे असल्याने डहाणूतील शेतकरीवर्ग भातकापणीच्या जोरदार तयारीला लागला आहे.
Published on

Palghar News : डहाणूत वाणगाव कृषी मंडळातून ५६१.१८ हेक्टरवर उन्हाळी भातशेती कापणीयोग्य झाली आहे. सातत्याने हवामानाच्या बदलामुळे व पावसाच्या अनिश्चित स्वरूपामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीयोग्य झालेले भातपीक शेतात आडवे झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कापणी लांबली आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि पावसाची चिन्हे असल्याने डहाणूतील शेतकरीवर्ग भातकापणीच्या जोरदार तयारीला लागला आहे.

Paddy Harvesting
Paddy Production : धान खरेदीचे गुजरात कनेक्शन उघड झाल्यावर चौकशी

डहाणू तालुक्यात धामणी आणि कवडास या दोन धरणांचा पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्यात सारणी, घोळ, भराड, रानशेत, वधना, पिंपळशेत, म्हसाड, नानिवली, ऊर्से, सोनाळे या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भातशेती केली आहे.

Paddy Harvesting
Paddy Plantation : वळिवाने दडी मारल्याने भात पेरणी लांबणीवर

कालवा दुरुस्तीमुळे फटका

डहाणू तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती केली जाते; परंतु यंदा कालव्याच्या दुरुस्तीमुळे कासा मंडळातील गावे उन्हाळी भातशेतीपासून वंचित राहिली आहेत. यंदा कालव्याच्या दुरुस्तीमुळे कासा मंडलातील शेतकऱ्यांना उन्हाळी भातशेती करता आली नसल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

अवकाळीमुळे शेतीचे नुकसान

नुकतेच अवकाळी पावसाने डहाणूला उन्हाळी भातशेतीचे नुकसान केल्याने शेतकरी चिंतेत आहेत; सद्यःस्थितीतही ढगाळ वातावरण आणि पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी सकाळी भातशेतीची कापणी करून दुपारपर्यंत भात कापून पीक घरी साठवणूक करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com