Group Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Group Farming : गटशेतीला पुन्हा बळ ; २५ शेतकरी गटांना मिळणार आर्थिक मदत

Agriculture Scheme : राज्यात २०१४ नंतर सरकार सत्तेत आल्यावर गटशेतीला पुढे नेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली होती. परंतु २०१९ नंतर त्याचे काम काही प्रमाणात थांबले होते.

Team Agrowon

Pune News : राज्यात २०१४ नंतर सरकार सत्तेत आल्यावर गटशेतीला पुढे नेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली होती. परंतु २०१९ नंतर त्याचे काम काही प्रमाणात थांबले होते. मात्र आता गटशेतीला पुन्हा चालना देण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान कार्यक्रमप्रसंगी फाउंडेशनच्या राज्यस्तरीय चळवळीत सहभागी २५ गटांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी त्यांनी केली.  

सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन आयोजित ‘फार्मर कप स्पर्धा’ पुरस्काराचे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन हॉल येथे रविवारी (ता. २३) वितरण झाले. तर पाणी फाउंडेशनचे प्रमुख अमिर खान, किरण राव, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सत्यजीत भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पद्मश्री पोपटराव पवार, कृषी आयुक्त सुरज मांढरे, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, अतुल कुलकर्णी, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी आदी मान्यवरांकडून तालुकास्तरीय विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात २०१५ पासून पाण्यावर काम करत आहे. शेतीला शाश्वत पाणी मिळत नाही, तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही. यासाठी चळवळ उभी करण्याचे काम पाणी फाउंडेशनने केले आहे. त्यांनी झाडे लावणे, डीपसीसी, नाला बांध करणे अशी विविध कामे केली आहेत. या संपूर्ण चळवळीला लोक चळवळीचे स्वरूप दिले. यामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे वॉटर प्लस करून त्यापुढे आता फार्मर कप आला.

शेतकरी पुढे आला तर पाण्याचे नियोजन तोच करू शकतो. म्हणून फार्मर कपची संकल्पना चांगली आहे. शेती परवडत नाही, असे आज आपण म्हणतो, परंतु शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. राज्यात ७५ टक्के शेतकरी अल्पभूधाक आहेत. त्यामुळे ती परवडत नाही. त्यासाठी खर्च जास्त येत असून फायदा कमी होत आहे.

त्यामुळे गटशेती केल्यास गुंतवणूक कमी करून अधिक फायदा मिळवू शकतो. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन, सोलर पंप देत आहोत. याशिवाय गावातील सहकारी सोसायट्यांचे रूंपातर अॅग्री बिझनेसमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे या सोसायट्याची क्षमता वाढणार आहे. येत्या काळात ते काम मोठ्या प्रमाणात होणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘अॅग्रीस्टॅकमध्ये डिजिटायझेशन करण्यात येत आहे. त्यात महिलांचा सहभाग घेण्यात येणार असून पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण करण्यात येणार आहे. आता शासनाने ‘एआय’साठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. त्यात दहा हजार शेतकऱ्यांना सहभागी करून घेणार आहोत. त्यात कोणीही गैरव्यवहार करणार नाही, त्यावर काम होणार आहे. नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यासाठी राज्यात असलेली शासकीय एक लाखाची फौज ही पाणी फाउंडेशनच्या पाठीशी उभी राहील.’’

पाणी फाउंडेशनचे प्रमुख अमिर खान म्हणाले, ‘‘तीन वर्षापूर्वी शेतीचा ध्यास घेऊन काम सुरू केले होते. त्यामध्ये शेतीचा खर्च कमी करणे, पाणी उपलब्ध करून देणे, कमी खर्चात खते उपलब्ध करून देणे हे गटांच्या माध्यमातून सुरू केले होते. परंतु ते काम आता सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी जर समवेत असेल तर कोणतेही काम असाध्य नाही. त्यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे शेतीशाळा घेऊन काम करत आहे.

पाणी फाउंडेशनने हाती घेतलेल्या पाण्याच्या बाबतीतही शेतकऱ्यांनी चांगले काम केले आहे. हे काम राज्यभर नेण्यासाठी काम करत आहे.’’   किरण राव म्हणाल्या, ‘‘माती, पाणी, हवामान यामध्ये मोठे काम करण्याची गरज असून पोकरामध्ये सहभागी झालेल्या अनेक गटानी चांगले काम करत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.’’ अभिनेत्री स्पृहा जोशी, जितेंद्र जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

ड्रोनद्वारे रासायनिक फवारणी करू नये ः कृषिमंत्री

कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले, ‘‘पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्रित येऊन गट तयार होऊन एक चळवळ तयार होत आहे. त्यातून महिला पुढे येत आहेत. या स्पर्धेत तरुण वर्ग सहभागी झाला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून महिला गटांना ड्रोन दिले जातील. परंतु महिला गटांनी या ड्रोनद्वारे रासायनिक फवारणी करू नये, अशी अट आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी विषमुक्त शेतीला प्राधान्य दिले आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT