Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

BT Cotton Seed : नफेखोरीसाठी बीटी कपाशी बियाण्यांचे बुकिंग

Cotton Seed : बीटी कपाशीच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण करून ते जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने ठोक बियाणे विक्रेत्यांनी किरकोळ बियाणे विक्रेत्यांना अंधारात ठेवून कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे स्वत:च आगाऊ बुकिंग केले आहे.

Team Agrowon

Nanded News : बीटी कपा बियाण्यांचा तुटवडा निर्माण करून ते जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने ठोक बियाणे विक्रेत्यांनी किरकोळ बियाणे विक्रेत्यांना अंधारात ठेवून कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे स्वत:च आगाऊ बुकिंग केले आहे.

यामुळे बाजारात मागणी असलेल्या बीटी कपाशी बियाण्यांचा कृत्रीम तुटवडा होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालून बीटी बियाण्यांचे वितरण स्वत:कडे घ्यावे, अशी मागणी कृषी निविष्ठा विक्रेते धनराज मंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

बाजारात कपाशीला चांगला दर मिळाल्याने आगामी खरीप हंगामात कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी काही नामांकीत कपाशी बियाणे उत्पादक कंपनीच्या बीटी वाणांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. बियाणे, खते व कीडनाशक विक्रेत्यांच्या संघटनेने (माफदा) यापूर्वी कोणत्याही विक्रेत्यांनी बीटी कपाशी बियाण्यांचे आगाऊ बुकिंग करू नये, असे पत्र काढले होते.

परंतु माफदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून बंद पुकारला. यानंतर अधिकाराचा गेरवापर करून किरकोळ बियाणे विक्रेत्यांना अंधारात ठेवत स्वत: मात्र बीटी बियाण्याचे आगाऊ बुकिंग केले.

यानंतर हेच ठोक कपाशी बियाणे विक्रेते बाजारात मागणी असलेल्या ठराविक बीटी कपाशी बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण करून जादा दराने बियाणे विक्री करण्याचा घाट घालण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बीटी कपाशी बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून येणारे बियाणे थांबवून कृषी विभागाच्या ताब्यात द्यावे. प्रत्येक तालुक्यात लागवडीच्या सरासरीनुसार कृषी विभागाने किरकोळ बियाणे विक्रेत्यांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष बीटी कपाशी बियाण्यांचे शेतकऱ्यांना वितरण व्हावे, असे धनराज मंत्री यांनी निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT