Jalgaon Cotton Seed News : जळगावात कापूस बियाण्याच्या काही वाणांचा तुटवडा

Cotton Seed Shortage : जळगाव जिल्ह्यात तीन प्रकारच्या कापूस वाणांचा मोठा तुटवडा आहे. तसेच मागणी असलेले देशी कापूस बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

Cotton Cultivation : जळगाव जिल्ह्यात तीन प्रकारच्या कापूस वाणांचा मोठा तुटवडा आहे. तसेच मागणी असलेले देशी कापूस बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे.

कापसाची जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर लागवड होऊ शकते. बियाण्याचा पुरवठा सुरळीत व चांगला आहे. परंतु बोलगार्ड २ मधील बीटी कापूस वाणांध्ये तीन विशिष्ट वाणांना मोठी मागणी आहे. ही मागणी वाढतच आहे. पण त्याचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडे नसल्याची स्थिती आहे.

मागील महिन्यात दोन कंपन्यांच्या वाणांचा तुटवडा होता. वितरक या वाणांचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडे कमी करीत होते. आपापले ग्राहक सांभाळण्याचा प्रयत्न वितरक करीत होते. यामुळे किरकोळ विक्रेत्यांची अडचण झाली. तसेच अनेक ग्राहकांना जळगाव, चोपडा भागांत येऊन या वाणांची खरेदी करावी लागली.

आता कोरडवाहू कापूस लागवडीची तयारी सुरू आहे. काही जण लागवड करीत आहेत. परंतु बियाण्याची टंचाई सुरूच आहे. मुक्ताईनगर, जामनेर भागांतील अनेक शेतकरी छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा भागांत जाऊन या वाणांची खरेदी करीत आहेत.

Cotton Seed
Water Stock Update : नांदेडमध्ये पाऊस लांबल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट

तेथेही अव्वाच्या सव्वा दरात हे वाण उपलब्ध होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून, कापूस लागवडीवरही परिणाम होत आहे.

जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. यात तीन-चार कंपन्यांच्या वाणांची मागणी मागील काही वर्षे अधिक असते, हादेखील अनुभव आहे. परंतु या वाणांची टंचाई दूर करण्यासंबंधी कृषी विभाग अपयशी ठरल्याचा मुद्दाही उपस्थित होत आहे.

सरळ वाणांची मागणी

खानदेशात दोन कंपन्यांच्या सरळ किंवा देशी सुधारित कापूस वाणांची मागणी आहे. परंतु हे वाण उपलब्ध नाहीत. एका कंपनीने पुरवठाच करू शकत नाही, असे पत्र कृषी विभागाला मध्यंतरी दिले. या कंपनीच्या कापूस बियाण्याचा काळाबाजार मे महिन्यात वेगात झाला. आता एका कंपनीच्या देशी कापूस बियाण्याची मागणी असून, त्याचाही काळाबाजार सुरू आहे.

पाच ते सहा हजार रुपये प्रतिपाकिट या दरात शेतकरी त्याची खरेदी काळ्याबाजारात करीत आहेत. हा प्रकार पुढेही असाच सुरू राहील, असे दिसत आहे. कारण सध्या कारवाईसत्रही थंड आहे. जिल्ह्यात पूर्णवेळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाही. कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांचीही ऐन हंगामात बदली झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com