Cotton Bollworm Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bollworm : बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली

Cotton Pest : यंदा कापूस पट्ट्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली असून काही भागात तर तो दिसूनच आला नसल्याचे निरीक्षण केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : यंदा कापूस पट्ट्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली असून काही भागात तर तो दिसूनच आला नसल्याचे निरीक्षण केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी नोंदविले आहे. जळगाव आणि अकोला जिल्ह्यांत कापूस पिकाची पाहणी करण्यात आली. त्याआधारे नोंदविलेल्या तथ्यांच्या आधारे हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

देशात सुमारे १३० लाख हेक्‍टर तर महाराष्ट्रात सुमारे ४५ ते ४७ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. त्यामुळेच कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हे मुख्य पीक ठरले आहे. मात्र, गेल्या काही वर्षात कापूस पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. यावर्षी देखील काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी होत्या.

जळगावसह अकोला जिल्ह्यांतील या तक्रारींची दखल घेत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. विवेक शाह, सुजित कुंभारे यांच्या पथकाने दोन्ही भागात पाहणी केली. सरासरी २० पैकी २ बोंडांत बोंडअळी असल्यास नुकसान पातळी दहा टक्‍के अपेक्षित धरली जाते.

दहा टक्‍के प्रादुर्भाव हा नुकसान पातळीवर समजला जातो. मात्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर, रिधोरा आणि चांदूर तसेच जळगाव जिल्ह्यातील बोदवड, जामनेर, एरंडोल, भडगाव, पाचोरा, धरणगाव या भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीपेक्षा कमी दिसून आल्याचे निरीक्षण आहे. काही भागात तर तो दिसूनच आला नाही, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. त्यामुळे यंदा गुलाबी बोंडअळीमुळे होणारे नुकसान नियंत्रित राहील, असेही मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

एकही बोंड प्रादुर्भावग्रस्त नाही

‘सीआयसीआर’च्या तज्ज्ञांनी जळगाव आणि अकोला जिल्ह्यांत कापूस पिकाची पाहणी केली. त्या भागातील ‘केव्हीके’च्या तज्ज्ञांची देखील या वेळी उपस्थिती होती. या वेळी दहा बोंडे उघडून पाहिली असता काही ठिकाणी एकही बोंड प्रादुर्भावग्रस्त आढळून आले नाही तर काही ठिकाणी तीव्रता नुकसान पातळीच्या तुलनेत कमी होती, असे विवेक शाह यांनी सांगितले.

बोंड अवस्थेत पिकाची पाहणी केली जाते. त्यानुसार जळगाव आणि अकोला जिल्ह्यांच्या अनेक भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसूनच आला नाही. काही भागात तो ५ टक्‍केपेक्षा म्हणजे नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव दरवर्षी होतो. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीच्या उपायाअंतर्गत शेतकरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीच करतात. त्यामुळे देखील यंदा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीपेक्षा कमी आहे.
- विवेक शाह, शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
राज्याच्या विविध भागात तूर्तास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात म्हणजे नुकसान पातळीच्या खाली असल्याचे चित्र आहे. दरवर्षी प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ही स्थिती आहे. परंतु, गाफील राहून उपयोग होणार नाही. सध्या काही भागात बोंडे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने बोंडे उघडली आहेत. दर दहा दिवसांनी निरीक्षण नोंदविले जाते. काही भागात रस शोषक किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
- डॉ. वाय जी प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT