Dombivili MIDC Blast Agrowon
ॲग्रो विशेष

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील केमिकल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट; काचा फुटल्या, पाच ते सहा कामगारांसह नागरिक जखमी

Dombivli Boiler Blast : डोंबिवलीतील एमआयडीसी फेज दोनमध्ये अंबर केमिकल कंपनीचा बॉयलर स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. तर झालेल्या दोन स्फोटात पाच ते सहा कामगारांसह शेजारी राहणारे नागरिक जखमी झाले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Dombivili Blast News : डोंबिवली मानपाडा येथील एमआयडीसी फेज दोनमध्ये गुरुवारी (ता. २३) दुपारी २ वाजता भीषण स्फोट झाल्याने आगीचे लोट उठले आहेत. ही आग अंबरणात केमिकल कंपनीतील बॉयलर स्फोट झाल्याने लागल्याचे समोर आले आहे.

तर येथे ३ स्फोट झाल्याने शेजारी असणाऱ्या घरांसह इतर कंपन्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटाच्या आवाजाने फुटलेल्या काचा घरात असणाऱ्या लोकांना लागल्याने ते जखमी झाले आहेत.

तर या स्फोटात पाच ते सहा कामगार देखील जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ६ अग्नीशामक बंब पोहचले आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली एमआयडीसीमधील फेज २ मध्ये असणाऱ्या अंबर केमिकल कंपनीच्या बॉलरलचा स्फोट झाला. यास्फोटामुळे येथे धुरांचे लोट उसळले असून आग परिसरात पसरत आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या ६ बंब दाखल झाले असून कंपनीत ३ स्फोट झाले आहेत.

दरम्यान बॉलरलचा स्फोटामुळे घरांसह इतर कंपन्यांच्या खिडकांच्या काचा फुटल्याने सहा ते सात कामगारांसह सुमारे २५ नागरीक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण केमिकल कंपनीला लागलेली आग वाढत असून शेजारी असणाऱ्या कंपन्या आणि रहिवाशी परिसराला धोका निर्माण झाला आहे.

आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड

सध्या मुंबईसह राज्यात उष्णतेचा कहर सुरू असून डोंबिवली तापमान ४२ अंश सेल्सियसवर आहे. यादरम्यान हा स्फोट झाल्याने आग वाढत आहे. तर गेल्या दीड तासापासून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सध्या अग्नीशमन दलाकडून केले जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या देखील रवाना झाल्या असून सध्या येथे ६ बंब आगी नियंत्रणात आणत आहेत.

नागरिकांनी धाव

कंपनीच्या बॉलरलचा स्फोट झाल्यानंतर याचा आवाज २ एक किलोमीटरपर्यंत गेला. तसेच स्फोटाने अनेक वस्तू हवेत उडाल्या. यामुळे रहिवाशांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

डोंबिवलीतील एमआयडीसी स्फोटाची माहिची मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, डोंबिवलीतील घटनेची माहिती मिळाली. याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. तर घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि खासदार पोहोचले असून रेस्क्यू टीम देखील दाखल झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

याघटनेवरून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी, आगीच्या भीषणतेवरून परिसरातील रहिवाशांना बाहेर काढले जात आहे. तसेच घटनेचे गांभीर्य पाहता डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात आले असून कंपनीने फायर ऑडिट केले जाईल. जर यात कसूर दिसल्यास कारवाई करू असे म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

डोंबिवलीत आज झालेल्या दुर्घटनेवरून पुन्हा एकदा फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कंपनीचे फायर ऑडिट केले गेलेले नाही असा केला आहे. तसेच त्यांनी आग लागते, यानंतर चौकशी होते. याच्या बातम्या होतात आणि तो विषय संपतो. मात्र यावर ठोस उपाययोजना का होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT