Blast in Nagpur : नागपूर हादरलं! दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत ९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Aslam Abdul Shanedivan

मोठा स्फोट

नागपुरातील दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Blast in Nagpur | Agrowon

बाजरगाव येथील घटना

हा स्फोट नागपुरातील बाजरगाव येथील स्फोटक बनवण्याच्या कारखान्यात झाला. ज्यात मृत्यूची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Blast in Nagpur | Agrowon

काम सुरू असताना स्फोट

हा स्फोट नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये आज रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात झाला. तर दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Blast in Nagpur | Agrowon

पुण्यातही मोठी घटना

पुणे येथील पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे येथे देखील मागील आठवड्यात अशीच घटना घडली होती. ज्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर येथे स्पार्क कँडल बनवणाऱ्या कारखान्यास आग लागली होती.

Blast in Nagpur | Agrowon

केमिकलमुळे स्फोट?

या सोलर एक्सप्लोरी कंपनीत संरक्षण क्षेत्राशी संबंधित दारूगोळा निर्मितीचे काम सुरु असते. येथे कास्ट बूस्टर प्लँन्टमध्ये पॅकिंगचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला. ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर हा स्फोट केमिकलमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Blast in Nagpur | Agrowon

आगीवर नियंत्रण

सोलर एक्सप्लोरी कंपनीत झालेल्या स्फोटानंतर येथे आग लागली. ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस आणि अग्नीशमन दलाचे बचावपथ घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण करण्यात यश मिळवले आहे.

Blast in Nagpur | Agrowon

मृतांच्या वारसांना शासनाची मदत

या घटनेची माहिती मिळताच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी एक्सवर ट्विट करत, स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे म्हटलं आहे.

Blast in Nagpur | Agrowon
Hydroponic Fodder Farming | Agrowon
आणखी पाहा