Nagpur Blast : दारूगोळा कारखान्यातील स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू

Nagpur Factory Explosion : बाजारगावस्थित दारूगोळा बनविण्याच्या सोलार एनर्जी कंपनीत रविवारी (ता.१७) सकाळी ९ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटात तब्बल ९ कामगारांना आपला जीव गमवावा लागला.
Nagpur Factory Blast
Nagpur Factory BlastAgrowon

Nagpur News : बाजारगावस्थित दारूगोळा बनविण्याच्या सोलार एनर्जी कंपनीत रविवारी (ता.१७) सकाळी ९ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटात तब्बल ९ कामगारांना आपला जीव गमवावा लागला.

या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नागपूर-अमरावती मार्गावर बाजारगाव नजीक सोलार एनर्जी कंपनी आहे. या कंपनीव्दारे इकॉनॉमिक एक्‍सप्लोझिव्ह लिमिटेड ही कंपनी नियंत्रित केली जाते. या कंपनीमार्फत देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्र तयार केली जातात. सध्या येथे भारतीय लष्कर आणि नौदलासाठी विविध शस्त्रे तयार केली जात आहेत.

(ॲग्रो विशेष)

Nagpur Factory Blast
Agriculture Research : डॉ. कुलकर्णी यांच्या शोधप्रबंधाची आंतरराष्ट्रीय जर्नलकडून दखल

तसेच या कंपनीच्या माध्यमातून भारताबाहेर ३० हून अधिक देशांमध्ये शस्त्रे निर्यात सुद्धा केली जातात. रविवारी सकाळी या कंपनीत नेहमीप्रमाणे दारूगोळा पॅकिंग करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक हा स्फोट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nagpur Factory Blast
Agricultural Mortgage Scheme : सोयाबीन, मका, गव्हासह सुपारी आणि बेदाणासाठी शासनाची ही योजना आहे खास

या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने या ठिकाणी असलेले कामगार गंभीररीत्या भाजले. यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित तिघे गंभीर जखमी आहेत.

मृतांची नावे अशी...

मृतांमध्ये युवराज किसनजी चारोडे (बाजारगाव, नागपूर), ओमेश्‍वर किसनलाल मच्छीरके (चाकडोह, नागपूर), मिता प्रमोद उईके (अंबाडा सोनक, नागपूर), आरती निळकंठ सहारे (मासोद, नागपूर), स्वेतील दामोदर मारबते (कन्नमवार गाव, वर्धा), पुष्पा श्रीरामजी मानपूरे (शिराळा, अमरावती), भाग्यश्री सुधाकर लोणारे (भूज तुकूम, चंद्रपूर), रुमिता विलास उईके (ढगा, वर्धा), मोसम राजकुमार पटले (पाचगाव, मोहाडी, भंडारा) यांचा समावेश आहे. घटनेनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com