Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Agri Inputs : बोगस खते, बियाणे विकणाऱ्यांची गय नाही

Fake Fertilizer : चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस खते-बियाणे विक्री करण्याच्या तक्रारी आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी केले.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस खते-बियाणे विक्री करण्याच्या तक्रारी आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी केले.

करमाळा कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. गुरुवारी (ता. ५) कुंभेज फाटा येथील सुप्रीम मंगल कार्यालय येथे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला तालुक्याच्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

आमदार नारायण पाटील म्हणाले, त शेतकऱ्यांची खत-बियाणे औषध यातून फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी अधिकारी व संबंधित खते बियाणे विक्रेत्यांनी घ्यावी.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, संभाजी पवार, संतोष वारे, प्राचार्य जयप्रकाश बिले, विकास गलांडे उपस्थित होते.

खरीपासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी काम करत आहेत. अशा परिस्थितीत खते -बियाणे योग्य दारात शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. विनाकारण शेतकऱ्यांना लिंकिंग खताची विक्री करू नये. शेतकऱ्यांची पिळवणूक झाल्यास शेतकऱ्यांना थेट माझ्याशी संपर्क साधावा.
- संजय वाकडे, उपविभागीय कृषी अधिकरी, माढा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT