BJP Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Election Result 2023 : उत्तर भारतातील तीन राज्यांत भाजपराज; तेलंगणात काँग्रेसला कौल

BJP Won Assembly Election : देशातील बहुतेक सर्व राजकीय विश्र्लेषकांचे आणि राजकीय नेत्यांचेही अंदाज फोल ठरवीत मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले.

Team Agrowon

Pune News : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकालातील रविवारी (ता. ३) सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येत असल्याची चिन्हे आहेत. तेलंगणात मात्र भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ला मागे सारत कॉंग्रेसने एकहाती सत्तेच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली आहे.

देशातील बहुतेक सर्व राजकीय विश्र्लेषकांचे आणि राजकीय नेत्यांचेही अंदाज फोल ठरवीत मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले. काँग्रेसलाही अगदीच रिकाम्या हाताने न पाठविता त्यांच्याकडेही चार पैकी एका राज्याची सत्ता सोपविली.

लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये निकाल जाहीर झालेल्या चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपने काँग्रेसला सपशेल पराभूत केले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतदारांनी काँग्रेसला घरी बसविले. तेलंगणाच्या जनतेने मात्र त्यांना ‘हात’ दिला. येथे काँग्रेसने गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारत राष्ट्र समितीला धूळ चारली.

स्पष्ट बहुमतामुळे `धावपळ` टळणार

निकाल जाहीर झालेल्या चारही राज्यांमध्ये विजयी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने निवडून आलेल्या उमेदवारांची ‘धावपळ’ होण्याची शक्यता कमी आहे. आता, राज्यातील नेता निवडीकडे सर्वांचे लक्ष असेल. तेलंगणामध्ये काँग्रेसकडून रेवंथ रेड्डी यांना नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. इतर तीन राज्यांमध्ये मात्र भाजप प्रयोग करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवडणुकीतील निर्णायक मुद्दे

मध्य प्रदेश

- ‘लाडली बहना’ योजनेमुळे महिला मतदारांची भाजपला अधिक पसंती

- सनातन धर्माचा विरोध केल्याने काँग्रेसबद्दल नाराजी

- विश्‍वासार्हतेच्या बाबतीत कमलनाथ यांच्यापेक्षा शिवराजसिंह चौहान यांना झुकते माप

राजस्थान

- दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याचा जनतेचा ‘रिवाज’

- पंतप्रधान मोदींना ‘पनौती’ म्हटल्याबद्दल जनतेमध्ये नाराजी

- काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा परिणाम

छत्तीसगड

- ‘महादेव ॲप’ गैरव्यवहार प्रकरणाचा काँग्रेसला फटका

- मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कामकाजाबद्दल नाराजी

- आदिवासीबहुल मतदारसंघांमध्ये भाजपला लक्षणीय यश

तेलंगण

- मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या दहा वर्षांच्या सत्तेविरोधात मतप्रवाह

- काँग्रेसने दिलेल्या नोकरभरतीच्या आश्‍वासनाचा प्रभाव

- ‘भारत जोडो’ यात्रेचा आणि रेवंथ रेड्डी यांनी केलेल्या जोरदार प्रचाराचा काँग्रेसला फायदा

कोणाला किती जागा (आकडेवारी सायंकाळी ६: ३० वाजेपर्यंतची)

मध्य प्रदेश (एकूण जागा : २३०)

भाजप : १६४

काँग्रेस : ६५

इतर : १

राजस्थान (एकूण जागा : १९९)

भाजप : ११५

काँग्रेस : ६९

इतर : १५

छत्तीसगड (एकूण जागा : ९०)

भाजप : ५५

काँग्रेस : ३५

इतर : ००

तेलंगण (एकूण जागा : ११९)

काँग्रेस : ६४

बीआरएस : ३९

भाजप : ८

इतर : ८

तुष्टीकरण आणि जाती-जातीत विभाजन करण्याच्या राजकारणाचे दिवस संपले आहेत, हे आजच्या निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. नवीन भारत ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉरमेंन्स’वर मते देतो. जनतेच्या मनात केवळ मोदी आहेत. या प्रचंड समर्थनासाठी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधील जनतेला नमन करतो.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT