Panjabrao’s Enduring Impact : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज शुक्रवार (ता.२७) १२६ वी जयंती साजरी होत आहे. भारत हा कृषीप्रदान देश म्हणून ओळखला जातो, कृषी क्षेत्रातील भक्कम पाया, कृषी धोरण आणि विचारांची वाटचाल करणारी व्यक्ती म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख (भाऊराव) यांच्याकडे आजही पाहिले जाते. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी भारतीय शेती आणि कृषी क्षेत्राला नवे वळण देणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.
राज्यातील नामांकीत असलेल्या अमरावती येथील 'श्री. शिवाजी शिक्षण संस्थे'चा पाया पंजाबराव देशमुख यांनी घातला. १० एप्रिल १९६५ रोजी पंजाबराब देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा स्मृतींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून २० ऑक्टोबर १९६९ रोजी देशमुख यांच्या नावाने अकोला येथे 'डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
दिल्लीतील कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताची जगात ओळख
पंजाबराव देशमुख हे केंद्रीय कृषीमंत्री असताना नवी दिल्ली येथे भव्य दिव्य अशा जागतिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ११ डिसेंबर १९५९ ते फेब्रुवारी १९६० या दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अंदाजे १०० एकर जागेत हे प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. कृषी प्रदर्शन भारताच्या कृषी क्रांतीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लावली होती. एक नवा क्रांतीचा विचार घेऊनच शेतकरी परतत होते. जवळपास २ कोटी शेतकऱ्यांनी या कृषी भेट दिल्याचे बोलले जाते.
या कृषी प्रदर्शनास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर, इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ, रशियाचे पंतप्रधान बुल्गानिन, कम्युनिष्ट पक्षाच्या सर्वेसर्वा निकिता कुश्चेव, भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या ऐतिहासिक कृषी प्रदर्शनाला भेट देत प्रशंसा केली होती.
'भारत कृषक समाजा'ची स्थापना
शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी पंजाबराव देशमुख यांनी 'भारत कृषक समाज' या संस्थेची स्थापन केली. समाजाचा अधिवक्ता असण्याचं धोरण राबविण्यासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वृत्तपत्र सुरू केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ७ फेब्रुवारी १९५५ रोजी भारत कृषक समाजाची स्थापना करून संपूर्ण शेतकरी समाजाला राष्ट्रीय स्तरावरील विचारमंच निर्माण करून दिले.
शेतकरी वर्ग असंघटित असल्यामुळे त्याची सर्वच स्तरातून लुबाडणूक केली जाते. जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची खरी नाळ ओळखली. यातून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारतात एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के शेती करणाऱ्या भारतीय शेतकऱ्यासाठी भारत कृषक समाज या राष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना केली. भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
अकोल्यात कृषी विद्यापीठ
महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत वसंतराव नाईक यांच्या सरकारने अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ साली कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापिठास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी याकरिता १९६८ साली आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात ९ जणांना प्राण गमवावा लागला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.