Farmer  Agrowon
ॲग्रो विशेष

Bio-Input Production Techniques : शेतकऱ्यांनी जाणले जैविक निविष्ठा उत्पादन तंत्र

Shilpa Tembhurnikar : निविष्ठांच्या उत्पादनासाठी बांधावरील लॅब उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शिल्पा टेंभूर्णीकर यांनी केले.

Team Agrowon

Nagpur News : जैविक शेतीकरीता लागणाऱ्या निविष्ठा बाजारातून खरेदी केल्यास उत्पादकता खर्च बचत होण्याऐवजी त्यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशाप्रकारच्या निविष्ठांच्या उत्पादनासाठी बांधावरील लॅब उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शिल्पा टेंभूर्णीकर यांनी केले.

पारडी येथील संजय बंड यांच्या शेतावर आत्मा तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित जैविक शेती प्रशिक्षण वर्गात टेंभूर्णीकर बोलत होत्या. जय भवानी शेतकरी महिला समूहाद्वारे गावपातळीवरील या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षणामध्ये दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धती, गांडूळ खत युनिटची उभारणी, त्याकरिता लागणारे साहित्य, ट्रायकोकार्ड तयार करण्याची पद्धत त्यासोबतच बांधावरील लॅब याविषयी माहिती देण्यात आली.

जैविक निविष्ठांचा वापर वाढल्यास जमिनीची सुपिकता वाढणार आहे. मात्र त्याकरिता लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी बाजारस्तरावरून केल्यास त्यामुळे खर्च कमी होण्याऐवजी वाढेल. ही बाब लक्षात घेता बांधावरच किंवा शेतातच अशाप्रकारच्या निविष्ठा उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे.

सामूहिकस्तरावर अशाप्रकारच्या निविष्ठा उत्पादनासाठी युनिटची उभारणी करावी. बांधावरील लॅब हा उपक्रमही त्यात महत्त्वाकांक्षी ठरत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी मनीषा शेवाळे, योगेश मानकर, प्रगती वासेकर, राकेश कुकडे, मनीषा पडोले यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT