Sand Depot : वाळू डेपो घेता का वाळू डेपो

Sand Policy : शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
Sand Mining
Sand MiningAgrowon
Published on
Updated on

Akola News : शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत एक वाळू डेपो सुरू झाला असून चार डेपो अद्याप सुरू झाले नाहीत. दुसरीकडे इतर पाच वाळू डेपोंसाठी एकही निविदा प्राप्त न झाल्याने त्यासाठी पुन्हा पुनर्निविदा काढण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २७) ई-निविदा स्वीकारण्यात येणार असून बुधवारी (ता. २८) ही ई-निविदा उघडण्यात येईल.

शासनाने वाळू उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्री करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार केले आहे. नव्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खनिकर्म विभागाने ३६ वाळू घाटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपोनिर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी २ मे २०२३ रोजी ई-निविदा जाहिरात प्रसिद्ध केली होती.

Sand Mining
Sand Policy : वाळू डेपोंना नव्या धोरणाचा फटका

या प्रक्रियेला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर याबाबत राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याने निविदेची प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. दुसऱ्यांदा राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत सुद्धा कंत्राटदार निरुत्साही दिसून आले.

त्यामुळे केवळ पाच डेपोंसाठीच कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या होत्या. नंतर राबविण्यात आलेल्या नऊ डेपोंसाठीच्या प्रक्रियेत केवळ एक डेपोसाठी निविदा प्राप्त झाली. खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नानंतर अखेर पाच डेपोंचा लिलाव झाला असून त्यांना मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे. परंतु अद्याप पाच डेपोंचा लिलाव न झाल्याने त्यासाठी पुढील प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

Sand Mining
Sand Committee : वाळूसाठी आता पुन्हा समितीराज

...अशी आहे वाळू घाटांची स्थिती

मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा वाळू डेपोचे उद्‍घाटन १० फेब्रुवारी रोजी करण्यात आले. परंतु इतर चार वाळू डेपोंच्या प्रारंभाची प्रतीक्षा आहे.

बाळापूर तालुक्यातील विरवाडा, कोडसारा, काजीखेड व तेल्हारा तालुक्यातील बाभूळगाव या चार वाळू डेपोंना मंजुरी देण्यात आली आहे. या डेपोंच्या निर्मितीसाठी कंत्राटदार प्रयत्न करीत आहेत. परंतु या वाळू डेपोंचे उद्‍घाटन कधी होणार याची प्रतीक्षा.

नुकत्याच पार पडलेल्या ई-निविदा प्रक्रियेत कट्यार वाळू डेपोसाठी एक निविदा प्राप्त झाली होती. सदर निविदा मंजूर करण्यात आली आहे.

मौजे कपिलेश्वर, नागद, गिरजापूर, मांजरी व डोंगरगाव या पाच वाळू डेपोंसाठी एकही निविदा प्राप्त न झाल्याने त्यासाठी तिसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com