Maharashtra Politics Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

BJP vs Congress: मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. परभणीचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर आणि जालनेचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sainath Jadhav

Pune News: मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. परभणीचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर आणि जालनेचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वरपूडकर यांचा प्रवेश आज (ता.२९) झाला असून गोरंट्याल यांचा स्वतंत्र प्रवेश सोहळा ३१ जुलै रोजी मुंबईत होणार आहे.

या दोन दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून भाजपाची ताकद स्थानिक निवडणुकांमध्ये वाढण्याचे संकेत आहेत.

सुरेश वरपूडकर यांचा भाजपात प्रवेश आज, मंगळवारी (ता.२९) झाला आहे. दुसरीकडे, कैलास गोरंट्याल यांनी सुरेश वरपूडकर यांच्यासोबत एकाच वेळी पक्षप्रवेश न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, त्यांचा स्वतंत्र पक्षप्रवेश सोहळा गुरुवारी (ता. ३१) मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात त्यांच्यासोबत काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यही भाजपात प्रवेश करणार आहेत.

कैलास गोरंट्याल यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे आणि मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करून पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली आहे. गोरंट्याल यांनी सांगितले की, आगामी महापालिका निवडणुकीत ते स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत आणि याबाबतची भूमिका ते भाजपा नेत्यांसमोर मांडणार आहेत. 

कैलास गोरंट्याल हे गेल्या ३५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. १९९९, २००९ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघातून विजय मिळवला होता. सध्या ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून जालना नगरपालिकेवर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनीही पाच वर्षे जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

सुरेश वरपूडकर यांच्याबाबत बोलायचे झाले तर, ते परभणी जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी १९९८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री आणि परभणीचे खासदार म्हणून काम पाहिले आहे. २०१९ मध्ये ते पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे परभणी, जालना जिल्ह्यांतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

या दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. याउलट, काँग्रेसची ताकद कमी होऊ शकते. मराठवाड्यातील राजकीय वातावरण आता आणखी तापण्याची चिन्हे आहेत, कारण या पक्षप्रवेशांमुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये नवीन आव्हाने आणि संधी निर्माण होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

September Rain: सप्टेंबरमध्ये विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात सरासरी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

Shet raste GR : शेतकऱ्यांच्या शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक; वाद टळणार? 

Indian Politics: स्थैर्याची कसोटी पाहणारा ‘सप्टेंबर’

Maharashtra Crop Loss: महाराष्ट्रात पावसामुळे १० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी

Climate Change Impact : उत्तरेकडील राज्यांत ढगफुटी, भूस्खलनात वाढ

SCROLL FOR NEXT