Forestry Nurseries Agrowon
ॲग्रो विशेष

ICAR certification: वनशेती रोपवाटिकांसाठी मोठा निर्णय! आता मिळणार अधिकृत अधिस्वीकृती

Agriculture Scheme: भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आता वनशेती रोपवाटिकांना प्रमाणित अधिस्वीकृती देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध होतील व फसवणूक टाळली जाईल. विदर्भातील सहा रोपवाटिकांना या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: रोप लागवडीनंतर प्लायवूड तसेच इतर उद्योगकामी वापरात येणाऱ्या झाडांचा अपेक्षित दर्जा अनेकदा मिळत नाही. निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे हे घडते. त्यातून बागायतदारांची बरीच वर्षे आणि व्यवस्थापनावरील पैशाही नाहक खर्ची जातो. त्याची दखल घेत आता अशा रोपवाटिकांना भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) देखील अधिस्वीकृतीच्या कक्षेत आणण्यात आले असून, नजीकच्या काळात विदर्भातील सहा रोपवाटिकांना प्रमाणित करण्यात आले आहे.

देशपातळीवर शेतकऱ्यांचा औद्योगिक क्षेत्रात वापरात येणाऱ्या सागवान, मोहगणीसारख्या वृक्षांच्या लागवडीचा कल वाढला आहे. त्यामुळेच शासकीय सोबतच खासगी रोपवाटिकाधारकांकडून रोपांना देखील वाढती मागणी आहे. हीच बाब लक्षात घेता या क्षेत्रात गैरप्रकारही वाढीस लागले आहेत. निकृष्ट किंवा कीड-रोगग्रस्त रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो. त्याची लागवड केल्यानंतर अपेक्षित वाढ होण्यास पीकनिहाय तीन ते दहा वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो.

दर्जाहीन रोपांच्या परिणामी औद्योगिक वापरास पूरक दर्जा व वाढ न झाल्यास शेतकऱ्यांची बरीच वर्षे आणि त्यासोबतच व्यवस्थापनावरील खर्च नाहकचा ठरतो. त्यामुळे होणारे नुकसान मोठे राहते. हीच बाब हेरत रोपवाटिका क्षेत्रातील फसवेगिरीला चाप बसावा याकरिता ‘आयसीएआर’ने रोपवाटिकांचे प्रमाणीकरणाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात याकरिता सामाजिक वनीकरण विभागाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या संनियंत्रणात विदर्भात ही जबाबदारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत नागपूर येथील वनशेती संशोधन विभागावर सोपविण्यात आली आहे.

अधिस्वीकृती होते निःशुल्क

यातून संबंधित रोपवाटिका अधिस्वीकृत असल्याचे प्रमाणित केले जाते. अधिस्वीकृती कालावधी तीन वर्षाचा असून, याकरिता कोणतेही शुल्क तूर्तास तरी आकारले जात नाही, अशी माहिती डॉ. विजय इलोरकर यांनी दिली.

सागवान, बांबू, सिसू, लिली, चंदन यासह तब्बल २१ प्रकारच्या वनशेतीपूरक रोपांची विक्री करणाऱ्या नर्सरीला प्रमाणीकरण करण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून घेण्यात आला आहे. विदर्भात आतापर्यंत त्यानुसार बोथरा नर्सरी (बडनेरा), कारंजा घाडगे (वर्धा) अशा एकूण सहा नर्सरी अधिस्वीकृत करण्यात आल्या आहेत.
डॉ. विजय इलोरकर, प्रमुख, वनशेती संशोधन केंद्र, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT