Bidri Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory : ‘बिद्री’चा वाढीव ऊसदराचा १०७ रुपये दुसरा हप्ता आदा

Sugarcane Rate : कारखान्याने दोन टप्प्यांत ३ हजार ३०० रुपये उत्पादकांना दिले होते, तर आता उर्वरीत १०७ रुपयांचा हप्ता दिल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

sandeep Shirguppe

Sugarcane Rate Bidri Sugar : गत हंगामात गळितास आलेल्या उसाला ३ हजार ४०७ रुपये अंतिम ऊसदर देणार असल्याची घोषणा बिद्री सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने केली होती. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने वाढीव ऊसदराचा १०७ रुपयांचा दुसरा हप्ता ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कार्यकारी संचालक के. एस. चौगले (ता.२०) यांनी दिली.

या आधी कारखान्याने दोन टप्प्यांत ३ हजार ३०० रुपये उत्पादकांना दिले होते, तर आता उर्वरीत १०७ रुपयांचा हप्ता दिल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यकारी संचालक चौगले म्हणाले, ‘२०२३-२४ च्या गळीत हंगामात कारखान्यात ९ लाख ५४ हजार ७७६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून त्यापासून ११ लाख ९८ हजार ७०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा १२.५५ इतका मिळाला आहे. त्यानुसार प्रतिटन ३ हजार २०० रुपयांप्रमाणे ३०५ कोटी ५२ लाख रुपये यापूर्वी आदा केले आहेत कारखान्याच्या निवडणुकीनंतर नूतन संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत प्रतिटन रुपये २०७ इतका वाढीव ऊसदर दोन हप्त्यांत देण्याची घोषणा केली होती.’

गणेशोत्सवात पहिल्या हप्त्याची प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे होणारी ९ कोटी ५२ लाख रुपये रक्कम आदा केली आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उर्वरित १०७ रुपये दिवाळीला देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार दुसऱ्या हप्त्याची १०७ रुपयांप्रमाणे होणारी रक्कम १० कोटी २१ लाख ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. यावेळी कारखान्याच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT