ॲग्रो विशेष

Rice Crop Plantation : दुबार हंगामातील लावणीची लगबग

Rice Cultivation : पाताळगंगा परिसरात सिंचनाचा आधार असल्‍याने शेतकऱ्यांनी दुबार भाताच्या पिकाची लावणीला सुरुवात केली आहे. मशागतीचे तसेच रोप तयार करण्यासाठी पेरणीची काम सुरू आहेत.

Team Agrowon

Mumbai News : पाताळगंगा परिसरात सिंचनाचा आधार असल्‍याने शेतकऱ्यांनी दुबार भाताच्या पिकाची लावणीला सुरुवात केली आहे. मशागतीचे तसेच रोप तयार करण्यासाठी पेरणीची काम सुरू आहेत.

पाताळगंगातील माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या जांभिवली गावातील बामणोली धरणाचा पंचक्रोशीतील तसेच पाताळगंगा नदी काठच्या गावातील सिंचनासाठी उपयोग होतो. तर मोहोपाडा येथील शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा दुबार शेतीसाठी आधार होतो.

त्‍यामुळे आता नांगरणी, जमीन बंदिस्त, शेतातील गवत काढणे, पालापाचोळा गोळा करणे तसेच लावणीसाठी बियाणे पेरणी आदी कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. रोपाच्या वाढीसाठी थंडीचे वातावरण अनुकूल असल्‍याने दोन-तीन दिवसांपासून काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्‍या आहेत. दुबार भात लावणीसाठी रोप तयार होण्यास साधारण २५ दिवसांचा कालावधी लागत असल्‍याचे कृषी मित्र सुदाम कडपे यांनी सांगितले.

कडधान्य पिकासाठी अनुकूल वातावरण

रसायनीत काही दिवसांपासून गारवा जाणवत असून कडधान्य, भाजीपाला पिकासाठी अनुकूल वातावरण आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांकडून लागवड करण्यात येत आहे. सकाळच्या वेळी धुके पडत असल्‍याने सूर्यनारायणाचे दर्शन उशिराने होते. सध्या भाजीपाल्‍याची लागवड केली असून एक-दीड महिन्यात उत्‍पन्न येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

पेण तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी भातशेतीबरोबरच रब्बी हंगामातील वाल, चवळी, मूग यांसारख्या कडधान्याचेही पीक घेतात. यंदा बदलत्या हवामानामुळे वालाच्या गावठी शेंगांचे पीक उशिराने येण्याची शक्‍यता आहे. पेणच्या बाजारात पावट्याच्या शेंगांना १०० ते १२० रुपये भाव आहे.

पेणच्या गावठी वालाच्या शेंगा रुचकर असल्‍याने पोपटीसाठी मागणी असते, मात्र यंदा हवामानात बदलामुळे शेंगा उशिराने तयार होणार असल्‍याने विक्रीसाठी बाजारात उशिराने येतील. त्यामुळे सध्या खवय्यांकडून पावट्याच्या शेंगांची खरेदी होत आहे.
दिनकर शेडगे, विक्रेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT