Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : सहकारासाठी थोरात कारखाना शेतकरी हित जपतो : डॉ. तांबे

Sugar Factory : माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाची कामधेनू असलेला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना सहकारासाठी आदर्शवत आहे. शेतकरी हित जपत कारखान्याचे काम सुरू आहे

Team Agrowon

Nagar News : माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाची कामधेनू असलेला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना सहकारासाठी आदर्शवत आहे. शेतकरी हित जपत कारखान्याचे काम सुरू आहे, असे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते झाला. राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, बाजीराव पा. खेमनर, इंद्रजितभाऊ थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, मीनानाथ वरपे, अभिजित ढोले, रोहिदास पवार, माणिकराव यादव, अनिल काळे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, रमेश गुंजाळ, विनोद हासे, संभाजीराव वाक्चौरे, मंदाताई वाघ, मीराताई वरपे ,सुरेश झावरे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, ‘‘हे वर्ष थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. भाऊसाहेब थोरात यांनी कायम तत्त्वाचे राजकारण केले असून त्यांनी कधीही तत्त्वाची तडजोड केली नाही. अमृत परिवारासाठी राजहंस हा ब्रँड त्यांनी दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत तन्मयतेने आणि शिस्तीने ही आदर्श व तत्वे जपत सहकाराला आधुनिकतेची जोड देऊन संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला आहे. व्यवस्थापन कसे असावे हे दाखवून देत हा कारखाना सहकारातील इतर कारखान्यांसाठी मापदंड ठरला आहे.’’

याप्रसंगी ॲड. अशोक हजारे, ॲड मधुकरराव गुंजाळ, बाबासाहेब शिंदे, बापूसाहेब गिरी, तुळशीनाथ भोर, ॲड सुहास आहेर, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे, ॲड शरद गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT