Sugar Production : ‘नॅचरल शुगर’कडून गंधक विरहित साखर निर्मिती

Natural Sugar : हवामान बदलातील पर्यावरण असंतुलना बरोबरच विषारी रसायन युक्त अन्नधान्यामुळे मानवी जीवन अत्यंत धोक्यात आलेले आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Dharashiv News : हवामान बदलातील पर्यावरण असंतुलना बरोबरच विषारी रसायन युक्त अन्नधान्यामुळे मानवी जीवन अत्यंत धोक्यात आलेले आहे. ‘पर्यावरण संतुलीत विकास व विषमुक्त अन्न’ हे ध्येय उराशी बाळगून २२ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेल्या नॅचरल परिवाराने पर्यावरण संतुलीत विकास तर यापूर्वीच साधलेला आहे. मात्र विषमुक्त अन्न ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यात नॅचरल परिवारास आता १०० टक्के यश मिळालेले आहे.

चालु गळीत हंगामापासून १०० टक्के गंधक व इतर रसायन मुक्त (सल्फर व केमिकल फ्री) साखर निर्मितीस सुरुवात झालेली आहे. साखर निर्मिती प्रक्रियेमध्ये गंधकासह अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो.

त्यामुळे त्याचे शरीराला अपायकारक असे अंश काही प्रमाणात साखरे मध्ये मिसळतात व काही प्रमाणात साखर मनुष्याचे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये गंधक व केमिकल विरहित साखरेचेच उत्पादन व सेवन केले जाते.

Sugar Production
Sugar Production : कर्नाटकातही साखर उत्पादन घटीचे संकट

साखर हा मानवी आहारातील अत्यावश्यक घटक असून तो मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यादृष्टीने नॅचरल शुगरने गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून प्रकल्पाची सुरुवात केली व आज महत्प्रयासा नंतर व अनेक संशोधनानंतर हे स्वप्न वास्तवात साकार झाले.

Sugar Production
Sugar Production : ब्राझीलमधील साखर उत्पादनात वाढ सुरूच

चालु गळीत हंगाम २०२३-२४ पासून नॅचरल शुगरमध्ये साखर उत्पादन प्रक्रियेत गंधक व कोणत्याही घातक रसायनाचा वापर न करता ऑरगॅनिक एंझाईम्स्चा वापर करून व यंत्र सामग्रीमध्ये अत्याधुनिक बदल करून १०० टक्के गंधक विरहित साखर उत्पादनाची सुरुवात झाली आहे. त्यानुसार चालु हंगामासह यापुढे कायमस्वरूपी नॅचरल शुगर गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीमध्ये अग्रेसर राहील, असे कारखान्याकडून कळविण्यात आले आहे.

या चालु हंगामातील गंधक व रसायनमुक्त उत्पादीत पहिल्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कारखान्याचे सन्माननीय संचालक, प्रवर्तक, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे जनरल मॅनेजर यू. डी. दिवेकर व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com