Rakesh Tikait Agrowon
ॲग्रो विशेष

Rakesh Tikait On EVM : भाजपवाले वस्ताद, ईव्हीएम यांची मावशी; राकेश टिकैत यांची खोचक टीका

Rakesh Tikait On BJP : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून भाष्य केले आहे. टिकैत यांनी, आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे गणित समजू शकले नाही, असे म्हटले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हरियात यंदा विधानसभा निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले होते. येथे शेतकरी आंदोलन, खेळांडूचे आंदोलन आणि इतर प्रश्नामुळे भाजप अडचणीत येईल आणि काँग्रेस सत्तेवर येईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र निकालानंतर तिसऱ्यांदा भाजप सत्तेत आली आणि अनेकांना या निकालाने धक्का दिला आहे. यावरून भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भाष्य केलं आहे. टिकैत यांनी, आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे गणित समजू शकले नाही, असे म्हटले आहे. तर टिकैत यांनी हे वक्तव्य काँग्रेसच्या पराभवावर केले आहे. टिकैत यांनी रविवारी (ता.१३) प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसच्या पराभवावरून टिकैत म्हणाले की, "शेतकरी कोणत्याही पक्षासोबत गेलेले दिसत नाहीत. आंदोलनामुळे काही शेतकरी सरकारवर नाराज होते. जे काँग्रेससोबत गेले. तर काही शेतकरी सरकारच्या पाठीशी उभे राहिले. देशात निवडणुका धर्म, जात या आधारावर होतील असे काहींना वाटते. तर काही पक्षांना मतदान आपल्या बाजूने होईल असे वाटतं. पण पक्ष शेतकरी-कामगार निवडतो. पण जेंव्हा संघटनेचा विचार येतो तेव्हा तो संघटनेचा विचार करतो.

मात्र दिल्लीतील आंदोलनादरम्यान सर्वपक्षीय विचारसरणीचे लोक सामील झाले होते. यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात वेगळे चित्र पाहायला मिळेल, असे वाटतं होतं. मात्र निकालाचे गणित काही आपल्याला समजले नाही. जनतेने मतदान केलेच नाही, उलट ते जिंकले, असा आरोप भाजपवर टिकैत यांनी केला आहे. तसेच यावेळी टिकैत यांनी यूपीमधील ऊस समितीच्या निवडणुकांचा दाखवा देत तेथे इतर पक्षाच्या लोकांचे उमेदवारी रद्द केली जात आहे. तर मतदान न करताच येथे अनेक जिंकत आहेत, ही भाजपची साधी खेळी असल्याचे टिकैत यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, तेथे सरकारविरोधी वातावरण निर्माण केले जाते. यापूर्वी छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार होते. तेथे आंदोलन झाले तेव्हा भाजप सत्तेत आली. आता भाजपवाले वस्ताद झाले आहेत. निवडणूक आयोगाची शक्ती आणि बुद्धिमत्ता वापरून ते सहज निवडणूक जिंकतील. निवडणुका जिंकायच्या, सत्तेत राहायचं हे त्यांचे सूत्र बनल्याचे टिकैत यांनी म्हटलं आहे.

राज्यात भाजपविरोधात मोठी लाट असतानाही भाजप सत्तेत कशी आली याचे गणित काही कळले नाही. यामुळेच निवडणुकीत काहीतरी गडबड झाल्याचे वाटतं आहे. ईव्हीएम बूथवर पोहोचण्यापूर्वी ते कोणत्याही पक्षाला दाखवले जात नाही. याचे आधीच प्रोग्रामींग होते. हा सगळा ईव्हीएमचा खेळ असून ईव्हीएमच आता भाजपची मावशी बनल्याचा टोला टिकैत यांनी लगावला आहे.

यावेळी टिकैत विनेश फोगट यांच्या विजयावर देखील भाष्य केलं. टिकैत म्हणाले, विनेश जिंकली हे चांगले आहे, पण भाजपवाले त्यांच्या नेत्यांचा पराभव करतात. याआधी केशव मौर्य यांना निवडणुकीत भाजपने पराभूत केले होते. त्यांना पुन्हा भाजपने उपमुख्यमंत्री केले, हे विसरता येणार नसल्याचेही टिकैत यांनी म्हटलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

SCROLL FOR NEXT