Rakesh Tikait : कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर टिकैत यांचे नड्डांना पत्र; उत्तर देण्याची केली मागणी

MP and actress Kangana Ranaut : खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिने अलीकडेच तीन कृषी कायद्यांवरून वक्तव्य केलं होतं. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. त्यामुळे भाजपला उत्तर द्यावे लागले होते.
Rakesh Tikait
Rakesh TikaitAgrowon
Published on
Updated on

Pune News : भारतीय किसान युनियन (BKU) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी खासदार कंगना राणौतच्या वक्तव्यावरून भाजपला घेरलं आहे. टिकैत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहत उत्तर मागितले आहे. भाजप अध्यक्ष आपण आपल्या खासदाराच्या वक्तव्यावर नक्कीच उत्तर द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कंगना राणौत हिने अवीकडेच तीन कृषी कायद्यांवरून वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले होते.

टिकैत यांनी नड्डा यांना पत्र लिहत मंडीच्या खासदार कंगना रणौत हिच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तर कंगनाच्या विधानावरून प्रश्न करताना भाजप अध्यक्षांकडून उत्तराची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.

Rakesh Tikait
Rakesh Tikait : राकेश टिकैत सोयाबीन आंदोलनात सहभागी, म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भविष्य वाचवण्यासाठी हा संघर्ष...

तर कंगनावर टिकैत यांनी निशाना साधत कंगनाला देशाबद्दल काहीच माहिती नाही असे म्हटले आहे. टिकैत यांनी आपल्या पत्रात, 'श्री जगत प्रकाश नड्डा जी, आम्ही आशा करतो की तुम्ही निरोगी असाल आणि तुमची प्रकृतीही चांगली असेल. देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आपण पार पाडत आहात. आपण आपल्या पक्षाची विचारधारा पुढे नेण्याचे काम करत आहात. पण तुमची आणि पक्षाची काय मजबुरी आहे माहित नाही. जेणेकरून लोकसभेसाठी हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून कंगना रणौत सारखी उमेदवार द्यावी लागली. आपल्या या खासदारांना देशाची थोडीफारही माहिती नाही. त्या वारंवार देशातील शेतकरी समुदायाला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी अपमानित होत आहे.

Rakesh Tikait
Kangana Ranaut : रद्द केलेले ३ कृषी कायदे परत आणा, खासदार कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य; भाजपचे स्पष्टीकरण, काँग्रेसचा टोला

यावेळी टिकैत यांनी कंगनाच्या २०१४ मधील विधानाचाही समाचार घेतला. आपल्या देशाला २०१४ ला स्वातंत्र्य मिळाल्याचे कंगनाने म्हटले होते. कंगनाचे असे वक्तव्य समस्त स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांचा अपमान आहे. पण त्यावर पक्षाने कोणतीच भूमिका घेतली नाही. यामुलेच कंगनाने २०२०, २०२१ आणि आता २०२४ मध्ये शेतकरी आणि महिलांबद्दल असभ्यता आणि तिरस्कार दर्शवणारी वक्तव्य केलीत. कंगनाने शेतकऱ्यांना खलिस्तानी आणि दहशतवादी म्हटले होते. तर वादग्रस्त कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी केली होती.

कंगनाच्या अशा वक्तव्यांवरून भाजपच्या कोणत्याच जेष्ठ नेत्याने उत्तर दिले नाही. एका प्रवक्त्याने बाजू मांडली. यामुळे अशी वक्तव्य करण्यासाठी पक्ष सांगत आहे का? याचे उत्तर अध्यक्ष म्हणून आपल्याकडून हवे आहे. देशाच्या अन्नदात्याला वारंवार टार्गेट करून अपमानित केलं जात आहे. यावर भाजप उत्तर देणार का? असा सवाल केला आहे. तर आपण या पत्राला नक्कीच उत्तर द्याल, अशी अपेक्षाही राकेश टिकैत यांनी नड्डा यांच्याकडे पत्रातून व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com