Konkan Heat Wave Alert agrowon
ॲग्रो विशेष

Konkan Heat Wave Alert : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Sindhudurg Heat Wave : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Heat Wave : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची माहिती देण्यात येत आहे. याबाबत प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून सूचना करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाच होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशापुढे गेले आहे तर कोकणात दमट वातावरण आणि वाढलेला उष्मा यामुळे कोकणवासीयांच्या अंगाची लाही लाही होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने काही सूचना देण्यात आल्या आहेत.

काय करावे

१) परेसे पाणी प्या तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.

२) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

३) दुपारी बारा ते तीन दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा.

४) सुर्यप्राकशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.

५) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

६) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

७) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

८) उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके,मान,चेहरा झाकण्यात यावा.

९) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

१०) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT