Nashik News : द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या दोघा परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांना वणी पोलिसांनी अहमदाबाद (गुजरात) येथून ताब्यात घेतले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता आजअखेर (ता. १७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिंदवड येथील द्राक्ष उत्पादक शंकर बाळकृष्ण बैरागी (वय ५२) यांच्याकडून परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांनी ६ लाख १ हजार रुपयांचा द्राक्षमाल खरेदी करून पैसे देण्यास नकार दिला होता.
या प्रकरणी लोकेंद्र सिंह, दिवाण सिंह, सुनील सिंह, अनिल सिंह (रा. फत्तेपूर सिक्री, हसनपुरा, आग्रा, हल्ली मुक्काम खेडगाव, ता. दिंडोरी) यांच्याविरोधात १६ मार्च रोजी वणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
लोकेंद्र सिंह, दिवाण सिंह यांनी बैरागी यांच्या शेतात ५ फेब्रुवारी रोजी द्राक्ष बागेचा २५ रुपये प्रतिकिलो असा व्यवहार करून ८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान शंकर बैरागी यांच्याकडून २५ हजार १०० किलो द्राक्षे खरेदी केली. या व्यवहारापोटी ६ लाख २७ हजार ५०० रुपयांपैकी २६ हजार रुपये रोख देवूऊन उर्वरित ६ लाख १ हजार ५०० रुपये वारंवार मागणी करूनही दिले नाहीत.
गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या
सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. पथकप्रमुख विजयकुमार कोठावळे होते. पोलिसांनी अहमदाबाद (गुजरात) येथून दिवाण चंद्रभान सिंह व सुनील चंद्रभान सिंह यांना शनिवारी (ता. १३) ताब्यात घेतले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. तपास पथकात श्री. कोठावळे, पोलिस अंमलदार विजय लोखंडे व कुणाल मराठे होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.