Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Exam : जो सर्वोत्तम, तोच स्पर्धेत टिकेल

Team Agrowon

संकेत राजेभोसले

सन १८८३ मध्ये फेमीन कमिशनच्या शिफारशीनुसार शेतकऱ्‍यांच्या गरजा ओळखून कृषी विभागाची (Agriculture Department) स्थापना केली. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी उद्‍भवणाऱ्या समस्या व त्यावर करावयाचा उपाययोजना ओळखून शेतकरी हितासाठी वेळोवेळी उद्दिष्ट निर्धारित केले.

त्याचं उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सक्षम अधिकारी निवडण्याची जबाबदारी शासनाने ‘एमपीएससी’कडे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) (Maharashtra Public State Commission) दिलेली आहे. त्यानुसार तज्ज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाची गरज ओळखून परीक्षेचा अभ्यासक्रम बनवला जातो.

गेल्या काही दिवसांपासून एमपीएससी तर्फे घेण्यात येणाऱ्‍या कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमावर प्रश्‍न चिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न काही शाखेच्या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांत आंदोलने केली जात आहेत.

प्रशासनाला वेठीस धरून एमपीएससी च्या अध्यक्षांवर पक्षपातीपणाचे आरोप लावले जात आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे काही उच्च पदस्थ अधिकारी पण या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देत आहेत.

ऐन तोंडावर आलेल्या मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्या इतर शाखेच्या कृषी पदवीधरांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सुरू असलेल्या परीक्षेला स्थगिती देऊ नये म्हणून ते सुद्धा आयोगाच्या समर्थनात आंदोलन करत आहेत. त्यांचाच भाग म्हणून परभणी व राहुरी विद्यापीठामध्ये परीक्षार्थींकडून नुकताच मूक मोर्चा काढण्यात आला.

कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल जे भासवली जाते, त्यापेक्षा वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. आज एमपीएससीकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी एकूण ४०० गुणाची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी दोन पेपर घेतले जातात, त्यामध्ये पेपर १ व पेपर २ चा समावेश आहे,

प्रत्येक पेपर ची २०० गुणात विभागणी केली गेली आहे. यामधील पेपर १ हा कृषिविषयक सामान्य ज्ञानावर आधारित आहे तर पेपर २ मध्ये कृषी विज्ञान व तंत्रज्ञान यांचा समावेश केला आहे. पेपर १ मध्ये कृषी विभागात काम करीत असताना ज्या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे,

त्या सर्वांचा समाविष्ट करण्याचा प्रयत्न आयोगाकडून केला गेला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात काम करीत असताना आवश्यक असणारा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यास, विविध जमीन महसूल कायदे, शासकीय योजना याचबरोबर भविष्यातील शेतीसाठी व शेतकऱ्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्‍या काटेकोर शेती पद्धती, नॅनो-टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

पर्यावरण व अन्न उत्पादन व वाटप असे महत्त्वाचे घटक पण पेपर १ मध्ये समाविष्ट आहेत. पेपर २ मध्ये कृषी व त्यांच्या संलग्न शाखेतील पदवीच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामध्ये कृषी, कृषी अभियांत्रिकी, उद्यान विद्या, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, सामुदायिक विज्ञान, मत्स्यविज्ञान या शाखेतील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या बांधावर काम करीत असताना आवश्यक असणाऱ्या कृषी कीटकशास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्र, पशू विज्ञान व दुग्धशास्त्र या विषयांचाही समावेश अभ्यासक्रमांमध्ये करण्यात आला आहे.

अशा प्रकारे अभ्यासक्रम हा विविध कृषी व संलग्न शाखेतील विद्यार्थ्यांना समान संधी देणारा तयार करण्यात आला आहे.

कृषी अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांकडून त्यांचा अभ्यासक्रम फक्त १६ मार्कांचा आहे, असे भासवले जाते पण प्रत्यक्षात अभ्यासक्रमांचे विश्‍लेषण केल्यावर लक्षात येते, की ५ व्या अधिष्ठाता कमिटीच्या कृषी अभियांत्रिकी पदवी च्या आणि पेपर २ च्या अभ्यासक्रामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त साम्य आहे.

राहिला प्रश्‍न अभ्यासक्रम पूर्ववत करण्याचा तर यापूर्वी कृषी सेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर १ (अनिवार्य) व पेपर २ (वैकल्पिक) या प्रकारचे परीक्षा स्वरूप अवलंबले जायचे त्यामध्ये वैकल्पिक विषयामध्ये विद्यार्थ्यांना कृषी व कृषी अभियांत्रिकी यामधील एक विषय निवडण्याची मुभा होती.

सदर परीक्षेत पेपर १ मधील ४० टक्के कृषी अभियांत्रिकीचा जसाच्या तसा अभ्यासक्रम पेपर दोनमध्ये होता. त्यामुळे अभ्यासक्रम पुनरावृत्तीचा फायदा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होत असे व एकाच शाखेतील जवळपास ८० टक्के अभ्यासक्रम होता.

त्या तुलनेत पेपर २ मधील कृषी या वैकल्पिक विषयात कृषी व त्यांच्या संलग्नचे ६ पदवी चे विषय कृषी, उद्यान विद्या, अन्न शास्त्र, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, वन विभाग या सर्वांचा समावेश होता.

जुन्या अभ्यासक्रमात कृषी विषय कृषी अभियांत्रिकी विषयांच्या तुलनेत अधिक मोठा व क्लिष्ट स्वरूपाचा होता. यांचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसत असे.

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत निवड झालेल्या कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी अन्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत नेहमीच जास्त असे. त्यामुळे अशा फक्त स्वतःच्या फायद्याच्या अभ्यासक्रमाकडे कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जास्त कल दिसतो.

विद्यार्थ्यांकडून पेपर २ हा अनिवार्य ऐवजी वैकल्पिक करण्याची मागणी केली जात आहे. पण वैकल्पिक विषयामुळे उमेदवाराकडे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व विषयांचे सखोल ज्ञान आहे की नाही हे तपासले जात नाही.

त्यांचा दूरगामी फटका कृषी विभाग व शेतकऱ्यांनाच बसतो. आज वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांना रोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांत लम्पी स्कीन रोगांमुळे पशुधनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

त्यामुळे कृषी विभागात आज फक्त एका विषयात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीपेक्षा शेतीसंबंधी सर्वांगीण अभ्यास असणाऱ्या अधिकाऱ्‍यांची जास्त गरज आहे.

डार्विन सिद्धांतानुसार जो सर्व सक्षम अथवा सर्वोत्तम असेल तोच या जगात टिकतो. त्याचप्रमाणे या स्पर्ध्येच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांकडून सर्वांगीण ज्ञान अध्ययन करणे तितकेच गरजेचे आहे.

पदवीत काय शिकलो यापेक्षा कृषी अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान आपण मिळवले आहे का? यांचा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे विचार करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राज्यातील कृषी विद्यापीठ प्रशासनाला वेठीस धरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षा रद्द करण्याची जी मागणी करतोय, ती खरंच योग्य आहे का, यांचेही एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

संकेत राजेभोसले, ७४४७२८५१५७ (लेखक ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT