Turmeric Seed : पुढील वर्षीच्या प्रमाणित बेणे उत्पादन कार्यक्रमासाठी होणार बेणे उपलब्ध

Mahabeej : या माध्यमातून पुढील (२०२६) वर्षी हळदीचा प्रमाणित बेणे उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी पायाभूत बेणे उपलब्ध होईल, अशी माहिती ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक राम कुलकर्णी यांनी दिली.
Turmeric Farming
Turmeric Farming Agrowon
Published on
Updated on

Hingoli News : ‘महाबीज’कडून यंदा प्रथमच हळदीचे पैदासकार ते पायाभूत बेणे (ब्रीडर टू फाउंडेशन) उत्पादन घेण्यात आहे. या अंतर्गत तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ३ एकर क्षेत्रावर हळदीच्या फुले स्वरुपा वाणाची लागवड करण्यात आली आहे.

या माध्यमातून पुढील (२०२६) वर्षी हळदीचा प्रमाणित बेणे उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी पायाभूत बेणे उपलब्ध होईल, अशी माहिती ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक राम कुलकर्णी यांनी दिली. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड तसेच विदर्भातील वाशीम, अकोला जिल्ह्यांत हळद लागवड क्षेत्राचा विस्तार झाला आहे. इतर जिल्ह्यांतील शेतकरी हळद लागवडीकडे वळत आहेत. परिणामी बेण्याची मागणी वाढत आहे.

Turmeric Farming
Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

प्रमाणित बेणे उत्पादन कार्यक्रमाद्वारे बेण्याची उपलब्धता वाढू शकेल. शेतकऱ्यांना हळीचे शुद्ध बेणे मिळेल. त्यादृष्टीने ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महाव्यवस्थापक (उत्पादन) विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बेणे उत्पादन घेतले जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राकडून फुले स्वरुपा वाणाचे पैदासकार बेणे आणले आहे.

Turmeric Farming
Turmeric Production: देशात हळदीच्या क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढीचा अंदाज

तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, प्रक्षेत्र व्यवस्थापक शिवलिंग लिंगे यांच्या निगराणीत यंदा ५ जून रोजी तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तीन एकर लागवड करण्यात आली.

त्यापासून ३०० चे ३५० क्विंटल बेणे उपलब्ध होईल. त्यापासून ३० ते ३५ एकर लागवड होईल, फुले स्वरुपा वाण तुलनेने उत्पादनाच्या बाबतीत सरस असून कुरकुमीनचे प्रमाण अधिक आहे. हळदीच्या सेलम या प्रचलित वाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

परंतु या वाणाचे शुद्ध बेणे उपलब्ध नाही. पुढील वर्षी हळदीच्या १० ते १५ वाणांचे पायाभूत बेणे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. प्रमाणित बेणे उत्पादनासाठी बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडे नोंदणी केली आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com