INDIA Alliance
INDIA Alliance Agrowon

INDIA Alliance March : इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावर धडक मोर्चा

Voter List Irregularities : मतदार याद्यांच्या सखोल पडताळणीच्या (एसआयआर) मुद्द्यावर विरोधी इंडिया आघाडीकडून सोमवारी (ता. ११) निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
Published on

New Delhi News : मतदार याद्यांच्या सखोल पडताळणीच्या (एसआयआर) मुद्द्यावर विरोधी इंडिया आघाडीकडून सोमवारी (ता. ११) निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. तीनशेपेक्षा जास्त खासदार या मोर्चात सामील होणार आहेत.

एसआयआर आणि निवडणुकांतील कथित मतचोरीच्या विषयावरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. दरम्यान वरील दोन मुद्द्यांवर विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.

INDIA Alliance
Rahul Gandhi: राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देत दाखवली मतांची चोरी

एसआयआर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे संसदेत त्यावर चर्चा घेतली जाऊ शकत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. विरोधी पक्षांनी एसआयआरच्या मुद्द्यावरून घातलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात फारसे कामकाज होऊ शकलेले नाही.

संसदेत जनतेचा आवाज ऐकण्यात आला नाही तर रस्त्यावर संघर्ष केला जाईल, असे विरोधी पक्ष नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या खासदारांच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी साडेअकरा वाजता या मोर्चाची सुरुवात होईल.

आयोगाच्या आयुक्तांना विरोधी पक्षनेत्यांचे शिष्टमंडळ भेटण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात हा मोर्चा काढला जाणार होता. तथापि, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांचे निधन झाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.

INDIA Alliance
Rahul Gandhi: बोगस मतदानातून भाजपची सत्ता; निवडणूक आयोगाचे भाजपसोबत संगनमतः राहुल गांधी

बिहारमधील मतदार याद्यांच्या पडताळणीचे निमित्त करत लाखो लोकांची नावे यादीतून बाहेर काढण्यात आली असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. मतदार यादीत गडबड करून मतांची चोरी करण्याच्या विषयावर संसदेत चर्चा होणे गरजेचे आहे, असे खर्गे यांनी म्हंटले आहे.

विरोधकांच्या एकजुटीसाठी खर्गे यांच्याकडून स्नेहभोजन

दरम्यान एसआयआर आणि कथित मतचोरीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या उद्देशाने खर्गे यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसाठी सायंकाळी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अशा प्रकारच्या स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, हे विशेष. मतांची चोरी कशाप्रकारे केली जात आहे, याची माहिती त्यांनी या वेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com