AI In Farming : अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘एआय’ प्रकल्प

AI Weather Advisory : राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगच्या मदतीने हवामानासह पेरणी, कीड नियंत्रण याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सल्ला मिळणार आहे.
Google AI For Agriculture
Google AI For AgricultureAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगच्या मदतीने हवामानासह पेरणी, कीड नियंत्रण याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सल्ला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कोरडवाहू पीक संशोधन संस्था, अर्थात इक्रिसॅट आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) पुढाकाऱ्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हवामान सल्ला देण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

हवामानातील तीव्र बदलांमुळे शेतकऱ्यांची जोखीम वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध संस्था हवामान अनुकूल शेती पद्धती विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातूनच इक्रिसॅट आणि आयसीएआरच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हॉट्‍सअॅप बॉट विकसित केले जाणार आहे. या बॉटमधून शेतकऱ्यांना विविध सेवा पुरविण्यात येतील.

Google AI For Agriculture
Google AI Agri Project : ‘एआय’ शेतीसाठी गुगलचा नवीन प्रकल्प

‘‘या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रात केली जाणार आहे. तिथला अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर संपूर्ण देशात प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल,’’ असे इक्रिसॅटचे महासंचालक हिमांशू पाठक म्हणाले.

Google AI For Agriculture
AI In Agriculture: ऊस शेतीत एआयच्या वापरासाठी आयएसएमएचा एडीटीसोबत करार

‘एआय-पॉवर्ड कॉन्टेक्स्ट-स्पेसिफिक अ‍ॅग्रोमेट अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस फॉर क्लायमेट-रेझिलिएंट अ‍ॅग्रिकल्चर ॲट स्केल’ असे या प्रकल्पाचे नाव असून तो मॉन्सून मिशन-तीन अंतर्गत राबविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पशुसंवर्धन संस्था (आयएलआरआय), भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांचा त्यामध्ये सहभाग आहे.

इक्रिसॅटने यापूर्वी हवामान विषयक गुंतागुंतीची माहिती सोपी करण्यासाठी ‘इंटेलिजन्ट सिस्टिम्स अ‍ॅडव्हायझरी टूल (आयएसटी)’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला होता. त्याचा वापर करून मॉन्सून-दोन प्रकल्पात शेतकऱ्यांना शेती आणि हवामानाची माहिती दिली जात होती.

परंतु आताचा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपासून विविध टप्प्यांवरील कीड नियंत्रणासह हवामान विषयक सल्ला मिळू शकेल, असे इक्रिसॅटने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com