Grape Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pest Management : द्राक्षातील नवी कीड ः बेरी वेब मॉथ

Grape New Pest : द्राक्ष पिकामध्ये मुख्यत: थ्रिप्स, मिलीबग, स्टेम बोरर, तुडतुडे आदी किडींचा प्रादुर्भाव बागायतदारांना परिचित आहे. या किडींच्या प्रभावी नियंत्रणाचे उपाय माहिती आहेत.

Team Agrowon

राहुल वडघुले

द्राक्ष पिकामध्ये मुख्यत: थ्रिप्स, मिलीबग, स्टेम बोरर, तुडतुडे आदी किडींचा प्रादुर्भाव बागायतदारांना परिचित आहे. या किडींच्या प्रभावी नियंत्रणाचे उपाय माहिती आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष पिकात ‘बेरी वेब मॉथ’ या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीला सोयाबीनवरील पाने गुंडाळणारी अळी असे देखील म्हणतात. आजच्या लेखात या किडी विषयी माहिती घेऊ.

किडीची ओळख

किडीचे नाव ः बेरी वेब मॉथ (Berry Web Moth) किंवा सोयाबीन लीफ रोलर

शास्त्रीय नाव : Archips Spp. (या प्रजातीचे नाव Archips micaceana असावे अशी शक्यता आहे. तथापि त्याची निश्‍चिती करणे गरजेचे आहे. (संदर्भ ः डॉ. सचिन गुरळे, पी.एच.डी. कीटकशास्र, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सायखेडा)

किडीचा प्रकार ः दाताने कुरतडून खाणारी कीड

किडीच्या अवस्था ः पंख असलेले प्रौढ पतंग, अंडी, अळी, कोष.

नुकसान करणारी अवस्था ः अळी.

प्रादुर्भाव ः द्राक्ष मणी

यजमान पिके ः सोयाबीन

किडीचा आढळ ः भारत, चीन, इंडोनेशिया, श्रीलंका.

नुकसान ः या किडीमुळे साधारणतः जास्त नुकसान होत नाही. परंतु भविष्यात ही मुख्य कीड होऊ शकते.

नुकसानीचा कालावधी ः सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यात मणी १४ ते १६ मिमी आकाराचे झाल्यानंतर नुकसान निदर्शनास येते.

अळीचे वैशिष्ट्ये

अळी शक्यतो द्राक्ष घडामध्ये आणि जाळीमध्ये राहत असल्यामुळे कोणतेही कीटकनाशक तिथपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. त्यामुळे नियंत्रणास अडचण येते.

जीवनक्रम

या किडीच्या चार अवस्था दिसून येतात. याला संपूर्ण रूपबदल (Complete Metamorphosis) असे म्हणतात. यामध्ये पंख असलेले प्रौढ पतंग, अंडी, अळी आणि कोष या अवस्था असतात.

प्रौढ ः हे पंख असलेले असतात. पतंग अतिशय छोटे असतात. पंख पसरलेले, तर त्यांची लांबी १७ मिमी इतकी असते. उंची ८ मिमी इतकी असते. शेपटीचा भाग झुपकेदार, पुढचे पंख जांभळे ते तपकिरी असतात.

अंडी ः अंडी १ मिमी आकाराची गोलाकार ते अंडाकृती असतात. प्रौढ पतंग पानावर किंवा मण्यांवर अंडी घालतात.

अळी ः ही नुकसान करणारी अवस्था आहे. अळी ही फिक्कट हिरवट काळपट रंगाची असते. अळीच्या ७ नंबरच्या सेगमेंटवर दोन पिवळे ठिपके दिसतात. अंगावर केस असतात. तोंडाचा भाग तपकिरी असतो.

कोष ः द्राक्ष घडामध्ये तयार केलेल्या जाळीमध्ये कोष अवस्था आढळते. कोष अवस्था १५ ते २० दिवसांची असते.

लक्षणे

प्रादुर्भावाची लक्षणे द्राक्ष मणी ८ ते १० मिमी आकारमानाचे असताना दिसू लागतात.

ही कीड द्राक्ष घडाच्या आतमध्ये राहून मणी खाते. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही.

किडीने घडाच्या आतमध्ये जाळे तयार केलेले दिसून येते. या जाळ्यामध्ये ही कीड असते.

मण्यांच्या मागील बाजूने कीड खाण्यास सुरुवात करते. अगोदर मण्यांच्या वरील साल खाते व नंतर मणी खाते. याच ठिकाणी किडीची विष्टा आढळून येते. यावर इतर परजीवी बुरशींची वाढ होताना दिसून येते.

नियंत्रणाची दिशा

अद्याप किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची शिफारस करण्यात आलेली नाही. तथापि, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात.

बिव्हेरिया बॅसियाना, मेटाऱ्हायझियम या सारख्या जैविक कीटकनाशकांचा फवारणीद्वारे वापर करावा.

बॅसिलस थुरिनजेंसीस (BT) याची फवारणी घ्यावी.

या किडीचा प्रादुर्भाव एकाच वेळी सर्व बागेत दिसून येत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी कीड दिसेल तिथे तज्ज्ञांच्या सल्ल्याने ‘स्पॉट ॲप्लिकेशन’ करून किंवा हाताने कीड काढून नियंत्रण करावे.

पिवळ्या चिकट पॅडचा वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

SCROLL FOR NEXT