Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : धरणग्रस्तांचे नेतृत्व केल्याने झालेला लाभ

शेखर गायकवाड

Dam-Affected Issues : एका जिल्ह्यात एक मोठे धरण होणार होते. या धरणामध्ये एकूण १७ गावे बुडणार होती. धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये एकूण ४५ गावांना कॅनॉलने पाणी पुरवले जाणार होते. अधिकृतरीत्या सरकारने या धरणाचे लाभक्षेत्र पुनर्वसन कायद्यानुसार राजपत्रात प्रसिद्ध केले. धरणाचा पूर्ण सर्व्हे करून लाभक्षेत्र व बुडित क्षेत्राचे नकाशे तयार होण्यास तीन वर्षांचा वेळ लागला. त्यानंतर मात्र शासनाने धरणाला गती देण्याचे ठरविले.

धरणाच्या पायाचे काम सुरू झाले आणि सर्वप्रथम पायामध्ये जाणाऱ्या दोन वाड्यांमधील लोकांना धरणाच्या नव्याने होणाऱ्या भिंतीच्या खालच्या बाजूला तात्पुरते गावठाण करून देण्यात आले होते. एक-दोन वर्षे उलटल्यावर धरणाचे काम हळूहळू प्रगती करत होते. शासनाच्या पाठपुराव्यानंतर पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.

अंकुश नावाचा नेता धरणग्रस्तांचे नेतृत्व करीत होता. बुडित क्षेत्रामध्ये बुडणाऱ्या पहिल्या पाच गावांमध्ये त्याच्या गावाचा समावेश नव्हता. तरीसुद्धा तो धरणग्रस्तांसाठी भांडतो व धरणग्रस्तांच्या प्रश्‍नावर जिल्हा प्रशासनाला वेठीला धरतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती होते.

बुडित क्षेत्रातील पहिल्या गावासाठी लाभक्षेत्रामध्ये कुठे जमिनी देणार याबद्दलचे नियोजन कलेक्टर ऑफिसकडून सुरू झाले. बऱ्याच वेळा चर्चेसाठी बैठका झाल्यानंतर पहिल्या गावातील लोकांना लाभक्षेत्रातील उंडवडी नावाच्या गावात जमिनी देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले. त्यावर अंकुशने आम्ही आधी ते गाव बघून येतो, असे सांगितले. त्यामुळे जमिनी पाहण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने लवकर ठरवू नये असे कलेक्टरला सांगितले.

त्यानंतर मात्र त्याच संध्याकाळी अंकुश हा एकटाच उंडवडी गावामध्ये गेला. तिथल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची त्याने भेट घेतली. अंकुशने सांगितले, की आमचे पहिले गाव तुमच्या गावामध्ये पुनर्वसन वसाहत करून इथेच राहणार आहे. त्यामुळे जमिनीची पाहणी करायला मी आलो आहे.

पुनर्वसन खात्याकडून त्याने लाभक्षेत्रातील उंडवडी गावातील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनाला जाणार आहेत, याची यादी आणली होती. या यादीवरून वेगवेगळी नावे व त्यांच्या जमिनीची माहिती घ्यायला अंकुशने सुरुवात केली.

गावातला कोणता शेतकरी गरीब आहे व गुपचूप पुनर्वसनाला जमीन देईल आणि कोर्टात जाणार नाही, अशी पण माहिती त्याने गोळा केली. श्यामराव नावाच्या शेतकऱ्याची काळीभोर व पिकाऊ जमीन आहे व त्याची मागणी स्वतःच्या नावाने केल्यास कसलीच अडचण येणार नाही अशी अंकुशने खात्री केली.

प्रत्यक्ष सर्व धरणग्रस्तांना जमिनी दाखविण्याचा ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या धरणग्रस्तांबरोबर अंकुश सुद्धा जमिनी पाहण्यासाठी आला. इतर धरणग्रस्तांनी विचारणा करू नये म्हणून लाल पेनाने त्याने त्या यादीवर काही नावांपुढे फुली मारली. फुली मारलेल्या नावांमध्ये श्यामरावच्या नावासमोर पण लाल फुली होती.

या सर्व जमिनी खराब असून अतिशय माळरान आहेत. इथे गवताची काडी पण उगवत नाही असे त्याने इतर धरणग्रस्तांना सांगितले. दिवसभर जमिनी पाहण्याचा कार्यक्रम संपल्यावर दुसऱ्या दिवशी पुनर्वसन खात्याच्या ऑफिसमध्ये सर्व धरणग्रस्तांची संमतिपत्रे व त्यामध्ये जमीन चांगली असून आम्हाला पसंत आहे असा मजकूर लिहून अंकुशने सादर केली.

इतर धरणग्रस्तांना माहीत न होता व बुडणाऱ्या गावांत त्याचा समावेश नसतानासुद्धा अंकुशने स्वतःचे संमतीपत्रसुद्धा सादर केले. त्यामध्ये श्यामरावच्या जमिनीचा उल्लेख करून तीच जमीन आपल्याला मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.

पुनर्वसन खात्यातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरल्यामुळे व धरणग्रस्ताचे नेतृत्व करीत असल्यामुळे जी पहिली यादी पुनर्वसन खात्याने मंजूर केली त्यामध्ये अंकुशला पण जमीन मंजूर झाली.

काही धरणग्रस्तांनी त्याबद्दल शंका व्यक्ती केली असताना आपल्या गावासाठी अंकुशच सगळी मेहनत करीत असल्यामुळे व पहिल्या गावापासूनच धरणग्रस्तांचे पुनर्वसन चांगले व्हावे यासाठी अंकुश हा नेता धडपडत असल्याचे त्याच्या समर्थकांनी इतरांना पटवून दिले. याचेच नाव विकसनशील पुनर्वसन!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT