Pune News : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड अखेर पुण्यातील सीआयडी पोलिसांना शरण गेला. आज (ता.३१) दुपारी १२ वाजण्याच्यासुमारास कराड सीआयडी कार्यालयात दाखल झाला. यामुळे सीआयडी तपासाला आता गती आली असून कराड यांने आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असे म्हटले आहे.
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दाखल कराड यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपास सुरू असतानाच वाल्मिक कराड फरार होते. पण आज त्याने तो सीआयडीकडे समर्पण केले. मात्र अद्याप काही आरोपी फरार असून सीआयडीचे पथके त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकी कराड याने एक व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला. या व्हिडिओतून कराड याने आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत कोणताच संबंध नाही. मी खंडणी प्रकरणी शरण जात आहे. आपला न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे. तर याप्रकरणात ज्यांचा संबंध असेल त्यांना फाशीची व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात माझा देखील सहभाव असल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षा मलाही शिक्षा करण्यात यावेत असेही कराड याने म्हटले आहे.
तसेच कराड याने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावताना, राजकीय द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. तसेच जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी तयार असल्याचे कराड याने म्हटले आहे.
देशमुख यांच्या कन्येची पहिली प्रतिक्रिया
बीड येथील सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या वाल्मिकी कराडने समर्पण केल्यानंतर दिवगंत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलीस यंत्रणा काम करत होती. तर मग आरोपीला अटक करण्यात इतका वेळ का लागत आहे? आता तर गुन्हेगार स्वत: सरेंडर झाले आहेत. मग पोलीस यंत्रणा नेमकं कोणतं काम करत आहे? जर असाच तपास होणार असेल तर आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.