Santosh Deshmukh Murder Case : बीड संरपंच हत्या प्रकरण : धक्कादायक दावा करणाऱ्या दमानियांसह ठोंबरेंच्या अडचणी वाढ?

Anjali Damania And Rupali Thombre : बीड संरपंच हत्या प्रकरण : धक्कादायक दावा करणाऱ्या अंजली दमानियांसह रुपाली ठोंबरेंच्या अडचणी वाढल्या?
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseAgrowon
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगले तापलेलं आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी वेगवेगळे धक्कादायक दावे केले होते. याप्रकरणी दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दमानियांच्या धक्कादायक दाव्यानंतर बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी ठोंबरे यांच्यासह सात जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दमानियांचा खळबळजनक दावा

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. यावरून सध्या राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच दमानिया यांनी, फरार आरोपींची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता बीड पोलिसांनी दमानिया यांना नोटीस पाठवली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा, जरांगेंचा सरकारला इशारा

स्थानिक गुन्हे शाखेची नोटीस

तसेच ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आले होते, तो नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे बीड पोलिसांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही नोटीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी पाठवली आहे.

दमानियांचा पलटवार

आता या नोटीसवरूनही दमानिया यांनी पोलिसांना घेरलं असून माझ्या दाव्यानंतर पोलिसांनी येथे पथक पाठवायला हवं होतं. पण पोलिसांनी पडताळणी का केली नाही? याचा खुलासा करायला हवा. सदर घटना गंभीर असून सत्य बाहेर आले पाहिजे. पण पोलिसांकडून असे काहीच होताना दिसत नसल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Maharashtra Assembly Session : देशमुख हत्येवरून सभागृह सुन्न

ठोंबरेंसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

एकीकडे बीड पोलिसांनी दमानिया यांना नोटीस पाठवली असतानाच पोलिसांनी रुपाली ठोंबरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठोंबरे यांनी समाजमाध्यमावर आव्हाड यांच्या व्हॉट्सअॅप चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. तसेच आव्हाड यांच्यावर आरोप केले होते. मात्र आव्हाड यांनी, तो स्क्रीनशॉट आपला नसून खोटा असल्याचे सांगितले आहे.

तसेच याविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून कर नाही डर कशाला? असे त्यांनी म्हटले आहे. व्हॉट्सअॅप चॅटचा खोटा स्क्रीनशॉट शेअर केल्याप्रकरणी ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com