Well Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : चार दिवसात पाऊस नाय आला, तर हाती काहीच लागणार नाय...

Kharif Crops : बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४० मंडळात १६ ते २४ दिवसाचे पावसाची खंड पडले आहेत. या मंडळांमध्ये स्थिती चिंताजनक झाली आहे. आता पाऊस आला तरी या मंडळांमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार हे स्पष्ट आहे.

Santosh Munde

Beed News : ‘पिकाची स्थिती लई नाजूक झालीय. चार दिवसात पाणी नाही आलं, तर हाती काहीच लागणार नाही, महिन्यापासून पाऊस नाही. विहिरी कोरड्या पडल्यात. असच राहील तर जनावरे सोडून द्यावी लागतील...’ नेकनूर(ता. बीड) येथील शेतकरी वैजनाथ कदम खरिपाची कैफियत मांडत होते.

शेतकरी श्री. कदम म्हणाले, ‘पाऊसच उशिरा आल्याने उडीद, मुगाची पेरणी नाही. ७० टक्के सोयाबीन गेल्यात जमा आहे. सरकारच्या लोकांनी प्रत्यक्ष पाहणी करायला हवी. एक-दोन क्विंटल होईल की नाही याची शाश्वती नाही’.

जिल्ह्यातील ६३ पैकी ४० मंडळात १६ ते २४ दिवसाचे पावसाची खंड पडले आहेत. या मंडळांमध्ये स्थिती चिंताजनक झाली आहे. आता पाऊस आला तरी या मंडळांमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार हे स्पष्ट आहे.
- बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

यशवंत कदम म्हणाले, ‘२८ दिवसापासून पाऊस नाही. आजवर १२ बोअर घेतले, पैकी सहा बोअरमध्ये मोटरी आहेत. सकाळी दहा मिनिटं त्या चालतात. रोप तयार पण कांदा लावता येईना. सोयाबीनचा खर्च बी वसूल होणार नाही.’

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४० मंडळात स्थिती चिंताजनक आहे. या मंडळांमध्ये १६ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. काही मंडळात पावसाचा खंड २४ दिवसापर्यंत आहे

पावसाचा प्रदीर्घ खंड पडलेल्या मंडळांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील पाच पैकी तीन, आष्टीमधील सात पैकी पाच, बीड मधील ११ पैकी पाच, धारूरमधील तीन पैकी एक, गेवराईतील दहापैकी नऊ, केजमधील सात पैकी दोन, माजलगावमधील सहा पैकी सहा, परळीमधील पाच पैकी तीन पाटोद्यातील चार पैकी तीन, शिरूर कासारमधील तीन पैकी दोन मंडळांचा समावेश आहे.

पीकस्थिती अत्यंत वाईट आहे. पाऊस आला नाही, पीक वाळून जातील. पण पिण्याचे पाणी स्थिती चिंताजनक होईल.  
राजकुमार खांडेकर, दिंद्रुड, ता. माजलगाव

११ पैकी सहा तालुक्यात अपेक्षित पेरणी नाही

बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, वडवणी या सहा तालुक्यात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अपेक्षित पेरणी झालीच नाही. माजलगाव तालुक्यात सर्वात कमी ८० टक्के तर परळी तालुक्यात अपेक्षेच्या पुढे जाऊन ११० टक्के पेरणी झाली.

माजलगाव तालुक्यात जवळपास १३ हजार हेक्टर क्षेत्र नापेर आहे. जिल्ह्यात सोयाबीन व उडीद वगळता एकाही पिकाची अपेक्षित पेरणी झाली नाही. खरीप ज्वारीची तर केवळ अठरा टक्के पेरणी झाली. कपाशीचे क्षेत्रही अपेक्षेच्या तुलनेत पंच्याहत्तर टक्केच लागवडीखाली आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT