Medical Services Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Health Service : ग्रामीण ‘आरोग्या’त अडथळे

Health Department : पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन १३ वर्षे उलटली. जिल्ह्यातून अनेक विकासात्मक प्रकल्पाची उभारणी केली जात आहे; परंतु ग्रामीण भागात आरोग्य सेवा, दळणवळणाची साधने आदींचा अभाव दिसून येत आहे.

Team Agrowon

Vasai News : पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन १३ वर्षे उलटली. जिल्ह्यातून अनेक विकासात्मक प्रकल्पाची उभारणी केली जात आहे; परंतु ग्रामीण भागात आरोग्य सेवा, दळणवळणाची साधने आदींचा अभाव दिसून येत आहे. एकूण १३ आरोग्य संस्थांमधील, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. परिणामी जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर ताण निर्माण होत आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना काळातदेखील चांगले काम केले; मात्र अनेक ठिकाणी असणाऱ्या अतिदुर्गम भागात अडचणींचा सामना रुग्ण, त्यांचे कुटुंबीय व आरोग्य सेवेला करावा लागतो. प्रसूती असो की अन्य आजार असल्यास रस्ते मार्गाचा अडसर निर्माण होतो. त्यामुळे नदी, नाले ओलांडून रुग्णाला सुखरूप इस्पितळात नेण्यासाठी आटापिटा करावा लागतो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यातच जिल्ह्यात सामान्य रुग्णालय, लहान मुलांचे रुग्णालय आदींचा देखील अभाव आहे. एकीकडे जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु अद्याप ४६ आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी ६५८ पदांपैकी ३३४ पदे रिक्त आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ७७ पदे रिक्त असून केवळ ६० पदे भरली आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर ताण येत आहे. जिल्ह्यात स्त्री रोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, शल्य विशारद आदींची देखील आरोग्य केंद्रात कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आलेल्या रुग्णांना माघारी परतत खासगी रुग्णालयात तपासणी करावी लागते.

ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागात दळणवळणाचा अभाव असल्याने आरोग्य सेवेला अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे, मात्र ते पूर्ण होऊन कधी खुले होणार, याची प्रतीक्षा आहे. रुग्ण, अपघात दुर्घटना व अन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी अन्य महागड्या हॉस्पिटलचा पर्याय शोधावा लागत आहे.

सर्व रिक्त पदांची यादी तयार करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात जाहिरातदेखील आली आहे. त्यानुसार आरोग्य विभागात भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. परीक्षा, मुलाखत प्रक्रिया लवकरच होईल.
- अजय ठाकरे, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभाग, पालघर जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT