Mahavitaran Agrowon
ॲग्रो विशेष

Baramati Circle : बारामती परिमंडलास मिळाले चार नूतन अधीक्षक अभियंते

Mahavitraan Administration : महावितरण प्रशासनातर्फे नुकत्याच झालेल्या बदली व पदोन्नती प्रक्रियेतून बारामती परिमंडलास चार नूतन अधीक्षक अभियंते मिळाले आहेत.

Team Agrowon

Baramati News : महावितरण प्रशासनातर्फे नुकत्याच झालेल्या बदली व पदोन्नती प्रक्रियेतून बारामती परिमंडलास चार नूतन अधीक्षक अभियंते मिळाले आहेत. परिमंडलाचा अधीक्षक अभियंता पदाचा कोरम पूर्ण झाला आहे. या चारही अधीक्षक अभियंत्यांनी सोमवारी (ता. १५) आपापल्या पदाचा पदभार स्वीकारला.

बारामती परिमंडल कार्यालयात पायाभूत आराखडा विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक अभियंता हे पद रिक्त होते. या पदावर बारामती मंडल कार्यालयातील चंद्रशेखर पाटील यांची बदली झाली. सोमवारी दुपारी त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला तर बारामती मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंतापदी नगर शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांची पदोन्नती झाली. त्यांनी नुकताच श्री. पाटील यांच्याकडून बारामती अधीक्षक अभियंता पदाचा कारभार स्वीकारला.

सोलापूर मंडल अधीक्षक अभियंतापदी भांडूप शहर परिमंडलात कार्यकारी अभियंता पदी असलेले सुनील माने यांची पदोन्नतीवर सोलापूर अधीक्षक अभियंतापदी वर्णी लागली. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने माने नियोजनाला सुरवात केली आहे.

कवठे महाकाळ (जि. सांगली) विभागात कार्यकारी अभियंतापदी असलेले बाळासाहेब हळनोर यांची सातारा अधीक्षक अभियंता पदावर बढती झाली. त्यांनी सोमवारी सकाळी सातारा मंडल कार्यालयाचा पदभार स्वीकारून कामाला सुरवात केली.

बारामती परिमंडलात मंगळवारी (ता. २) मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडलाच्या आढावा बैठकीत चारही अधीक्षक अभियंत्यांचे स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT