Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Target : दोन हजार चारशे कोटींचे पीककर्ज

Agriculture Loan : खरीप तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा २ हजार ४०० कोटीचे पीककर्जाचे उदिष्ट देण्यात आले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : खरीप तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा २ हजार ४०० कोटीचे पीककर्जाचे उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आराखड्याला मान्यता दिली असून जिल्हा बँकेसह सर्वच बँकेच्या उद्दिष्टांत वाढ करण्यात आली आहे.

पीककर्ज वाटपासाठी गेल्या वर्षी बँकांना दोन हजार २०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत बँकांचे अडवणुकीचे धोरण कायम असते.

राष्ट्रीयीकृत बँका कासवगतीनेच पीककर्ज वाटप करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून नेहमीच केला जातो. गेल्यावर्षी राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने जास्त पीककर्ज वाटप केले होते. त्यामुळे पीककर्ज वाटपाची राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संथच असते.

यंदा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २०० कोटी रुपयांची वाढ केली आहे. यामुळे यंदा जिल्ह्याचे उद्दिष्ट दोन हजार ४०० कोटी झाले आहे.=

खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचण होवू नये म्हणून आतापासून तयारी केली जात आहे. यंदा २ हजार ४०० कोटींचे उदिष्ट निश्‍चित केले आहे. खरिपासाठी २ हजार २०० तर रब्बीसाठी २०० कोटींचे उदिष्ट असणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, असा प्रशासनाचा प्रयत्न राहील.
- विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT