Summer Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Heat : उन्हामुळे केळी, भाजीपाल्याला फटका

Summer Weather Update : अकोला जिल्ह्यात यंदा वाढलेल्या उष्णतामानाने पिकांचे अतोनात हाल होत आहेत. तापमान दररोज ४२ अंशांपार राहत असल्याने दाणापूर परिसरात पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात यंदा वाढलेल्या उष्णतामानाने पिकांचे अतोनात हाल होत आहेत. तापमान दररोज ४२ अंशांपार राहत असल्याने दाणापूर परिसरात पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. या संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

दाणापूरसह परिसर मोठ्या प्रमाणावर बागायती आहे. जवळच वारी हनुमान येथे बांधण्यात आलेल्या वाण प्रकल्पातूनही शेतीला पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाण्याचा दाणापूर, सोगोडा, वारी हनुमान, वारखेड, हिवरखेड, हिंगणी बुद्रुक, हिंगणी खुर्द आदी गावांना फायदा होतो. मात्र या वर्षी तापमानाने उच्चांकी गाठल्याने विहीर, बोअरवेलचे पाणी खोल गेले. काही शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी यंदा आटल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतांमध्ये कामाला जाणाऱ्या मजुरांना घरून पिण्यासाठी पाणी शेतात न्यावे लागत असल्याची विचित्र परिस्थिती झाली आहे. गावालगत वान नदी आहे. सध्या या नदीचे पात्र कोरडे असून, इतरही अनेक नाले या भागात आहेत. नदी-नाल्याचे खोलीकरण, साखळी बंधारे, गॅबियन बंधारे झाले तर येत्या वर्षात लाखो लिटर पाणी जिरवून पातळीत वाढ होऊ शकेल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांमधून शेततळे, नाला खोलीकरण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीच्या बांधावर बांबू लागवडीसारखे उपक्रम राबवले तर भविष्यात पाण्याचे संकट टाळता येईल.
अंकुश मानकर, तलाठी, दाणापूर
मी तीन एकरांवर केळीची लागवड केली आहे. या वर्षी तापमानात मोठी वाढल्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली. त्यामुळे केळी पिकाला मोठा फटाका बसणार आहे.
श्यामकुमार ढाकरे, केळी उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT