Summer Heat : कोल्हापुरात भाजीपाला पट्टा हतबल

Sunburn Effect on Vegetable : भाजीपाल्याचे आगर समजल्‍या जाणाऱ्या पूर्व भागाला वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत आह. पारा ४० अंशांच्या पार गेल्याने सर्वच भाजीपाल्याची वाढ खुंटली आहे.
Crop Issue on Summer
Crop Issue on SummerAgrowon

Kolhapur News : भाजीपाल्याचे आगर समजल्‍या जाणाऱ्या पूर्व भागाला वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत आह. पारा ४० अंशांच्या पार गेल्याने सर्वच भाजीपाल्याची वाढ खुंटली आहे. वाढत्‍या उष्णतेचा फटका फूल व फळधारणेवर झाल्याने उत्पन्नात सुमारे पन्‍नास टक्क्यांची घट येत असल्याचे शिवारातील चित्र आहे. केवळ सुरू प्लॉटवरच नव्हे तर नव्या लागवडीवरही उष्णतेचा परिणाम होत असून पाणी देऊनही लागवड केलेली कोवळी रोपे माना टाकत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत भाजीपाल्‍याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावे भाजीपाल्याचे आगार समजली जातात. गेल्‍या काही वर्षांत भाजीपाल्याचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले असले तरी अनेक गावांनी अजूनही भाजीपाल्याची ओळख जपली आहे. टोमॅटो, फ्लॉवर, कोबी आदींसह अन्य भाजीपाल्‍यामध्येही गावे अग्रेसर आहेत. गेल्‍या काही दिवसांपासून चाळीशी पार जाणाऱ्या उष्णतेने सर्वच भाजीपाला उत्पादकांची झोप उडविली आहे.

Crop Issue on Summer
Summer Heat : उन्हाच्या झळांनी भाजीपाला, फळ पिकांना फटका

अनेक गावांमध्ये पुरेसे पाणी असूनही वाढती उष्‍णता रोपे व फळांच्या वाढीस अडथळे आणत आहे. शिवारात गारवा राहत नसल्याने ज्या प्रमाणात भाजीपाल्यांची वाढ अपेक्षित आहे, त्या प्रमाणात ती वाढत नसल्याचे चित्र आहे. यामुळे भाजीपाला वजनालाही कमी बसत आहे. साहजिकच याचा परिणाम उत्‍पादन घटीवर होऊन भाजीपाला शेती तोट्यात येत आहे. वाढत्या उष्णतेला कोणताच इलाज चालत नसल्याने शेतकरी हतबल असल्‍याचे चित्र आहे.

अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिकांमधून रोपे आणून लावली. साधारणत या कालावधीत टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पण वाढती उष्णता उत्पादकांना नव्या लागवडीपासून रोखत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अशाही परिस्‍थितीत लागवडी केल्या त्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाणी देऊनही रोपे कोमेजून माना टाकत असल्याने आता रोपे जगविण्यासाठी काय करायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे.

अनेक शेतकऱ्यांनी अशी परिस्थिती पाहून भाजीपाला लागवडीचे नियोजन पुढे ढकलेले आहे. ज्या शेतकऱ्यांची कूपनलिका विहिरीच्या पाण्यावर आहे. त्यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ज्या कूपनलिकेचे पाणी सात ते आठ तास चालायचे ते तीन ते चार तासांवर आले आहे. वाढती उष्णता व पाणीटंचाई याचा दुहेरी फटका उत्पादकाला बसला आहे.

Crop Issue on Summer
Summer Heat : हापूसवर वाढत्या उन्हाचा परिणाम

वाढत्या उष्णतेचे परिणाम

टोमॅटोच्या लागवडी घटल्या

उन्हाच्या झळामुळे रोपांनी टाकल्या माना

‍जलस्रोतांमध्येही घट

फ्लॉवरच्या एका गड्ड्याचे वजन एक किलोवरून २०० ग्रॅमवर

फुलगळ होण्याच्या प्रमाणात वाढ

नव्या लागवडी संकटात

शेत तयार पण वाढत्या उष्‍म्याने लागवडीला विलंब

वाढती उष्णता पिकांच्या सहनशक्‍तिपलीकडे गेल्याने उत्पन्नात तब्बल पन्‍नास टक्क्यांपर्यंत घट आली आहे. अशा परिस्थितीचा मोठी फटका आम्हाला बसत आहे. दर नसल्याने आम्हाला कित्येकदा तोट्यात जावे लागते. आता वाढत्या उष्णतेने यात भर टाकली आहे.
संजय रजपूत, भाजीपाला उत्पादक, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com