Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र सुरू करावे

Banana Farming : केळी उत्पादनात आणि निर्यातीत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून १२ लाख ४३ हजार ८९९ मे. टन केळीची निर्यात होऊन यातील सुमारे ८ लाख २६ हजार ३२२ मे. टन केळी सोलापूर जिल्ह्यातून एक्स्पोर्ट झाली.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली.

ती मांडताना त्यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करत या केळी संशोधन केंद्राची गरज असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, नवीन कृषी महाविद्यालय व‌ कृषी संशोधन केंद्र सुरू न करण्याचा सरकारचा निर्णय झाला असल्याचे सांगत, यासंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून या संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा केला जाईल. शेतकरी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले.

केळी उत्पादनात आणि निर्यातीत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून १२ लाख ४३ हजार ८९९ मे. टन केळीची निर्यात होऊन यातील सुमारे ८ लाख २६ हजार ३२२ मे. टन केळी सोलापूर जिल्ह्यातून एक्स्पोर्ट झाली. राज्यातून होणाऱ्या निर्यातीत सोलापूरचा वाटा सुमारे ६६.४३ टक्के होता. त्यामुळे केळीसाठी हवामान, लागवड यासाठी संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण या दृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी केळी संशोधन केंद्राची गरज आहे.

या ठिकाणी कृषी विभागाच्या फळ रोपवाटिकेची व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू संशोधन केंद्राची सुमारे १०० एकर जागा उपलब्ध आहे. शेलगाव (वां) येथील या जागेवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे शासनाने संबंधित विभागाला आदेश दिले होते. तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे का? यावर शासनाने काय कार्यवाही केली? अशा प्रकारची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली.

यावेळी असा प्रस्ताव आल्याचे कृषिमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. सध्या महाराष्ट्रात जळगाव व नांदेड येथे केळी संशोधन केंद्र असल्याचे सांगितले गेले होते. मात्र नंतर यावर बोलताना सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे कोरडवाहू संशोधन केंद्र असताना शेलगाव येथे दुसरे कोरडवाहू संशोधन केंद्र आहे.

मग जिल्ह्यासाठी केळी संशोधन केंद्र का नको? ही बाब आमदार मोहिते- पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभाग, विद्यापीठ आणि कृषी विभाग व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावण्याची मागणी केली, ती कृषिमंत्र्यांनी मान्य केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

Rural School Development : पुणे जिल्ह्यातील वाडा येथे दुसरी समूह शाळा

Crop Loan Distribution: साडेतीन लाख कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Maharashtra Assembley Session: सावकारांचा जमीन हडपण्याचा प्रयत्न

Banana Harvest Delay: खानदेशात उष्णतेने लांबला केळी काढणी हंगाम

SCROLL FOR NEXT