Banana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Production : कांदेबाग केळी उत्पादनास फटका

Banana Crop Loss : मार्च ते जून या कालावधीत उष्णता व वादळामुळे खानदेशातील विविध भागांत कांदेबाग केळी पिकाची मोठी हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : मार्च ते जून या कालावधीत उष्णता व वादळामुळे खानदेशातील विविध भागांत कांदेबाग केळी पिकाची मोठी हानी झाली आहे. जमिनीचे तापमान ५२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले. याचा परिणाम पीकवाढीवर झाल्याने उत्पादन कमी आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कांदेबाग केळी पिकाची निसवण व अन्य व्यवस्थापन भर उन्हाळ्यात करावी लागते. कारण त्याची लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये होते. उष्णतेचे चार महिने व जूनमधील वादळ व अन्य समस्याही या बागा सहन करतात. यंदा उष्णता अधिक होती. वादळही सर्वच भागांत झाले. यामुळे खानदेशात कांदेबाग केळीला मोठा फटका बसला आहे.

बागांची निसवण व काढणीची प्रक्रिया पावसाळ्यात सुरू होते. परंतु या बागांना यंदा उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. जमिनीचे तापमानही ५२ अंश सेल्सिअसवर अनेक दिवस राहिले. एप्रिलमध्ये सुमारे १२ दिवस कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर राहिले.

या महिन्यात तापमानाने कहर केला. पुरेसे पाणी देऊनही कांदेबाग केळी होरपळली आहे. हलक्या, मध्यम जमिनीत बागांना उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. केळी पीक ४० अंश सेल्सिअसपर्यंतच्या वातावरणात बऱ्यापैकी असते. यापेक्षा अधिक तापमान काही दिवस राहिल्यास पिकाच्या वाढीला फटका बसतो.

पिकाची अन्नग्रहण क्षमता पूर्ण खालावते. खानदेशात एप्रिल व मे महिन्यात केळी पिकासाठी प्रतिकूल वातावरण राहिले. त्यामुळे पीकहानी वाढली आहे. त्यातच वादळी पाऊस, वेगाचा वाऱ्यामुळे केळीची पाने फाटली. यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंद झाली. पीकवाढ झालेली नाही. कांदेबाग केळीची निसवण जूनअखेरीस सुरू होते.

परंतु यंदा निसवण काहीशी लांबणीवर पडली. तसेच निसवणीलाही फटका बसला. कमी फण्या व दर्जा यावरही परिणाम झाला. यामुळे १२ ते १८ किलोची रास शेतकरी मिळवू शकले आहेत. कांदेबाग केळी पिकाची काढणी अनेक भागात पूर्ण झाली आहे. उशिराचे पीक १० ते ११ महिन्यांचे आहे. त्यातही काढणी अर्धीअधिक संपली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT