Jalgaon Banana Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Production : केळीचे उत्पादन ठरू शकते उसाला सक्षम पर्याय

Banana Cultivation : कृषी विभागाच्या वतीने राडी येथे रब्बी हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मुळीक यांनी शेतकऱ्यांना केळी लागवडी व रब्बी पिकांची पेरणी बीजप्रक्रियेबाबत माहिती दिली.

Team Agrowon

Beed News: शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या मागे न लागता वेगवेगळे प्रयोग करून पर्यायी पीक म्हणून केळीसारखी लागवड केल्यास फायदा होऊ शकतो. ऊसाला पर्याय पीक म्हणून केळी लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी राडी (ता. अंबाजोगाई) येथे शनिवारी (ता.२६) शेतकऱ्यांना रब्बी हंगामाबाबत मार्गदर्शन करताना केले.

कृषी विभागाच्या वतीने राडी येथे रब्बी हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मुळीक यांनी शेतकऱ्यांना केळी लागवडी व रब्बी पिकांची पेरणी बीजप्रक्रियेबाबत माहिती दिली. बीजप्रक्रियेशिवाय पेरणी करू नये.

बीजप्रक्रियेचे फायदे व उत्पन्नवाढीचे पंचसूत्र कार्यक्रम आखण्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी विभागाच्या सर्व योजना सांगून शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या यांनी पुढे यावे. कृषी विभागाच्या वतीने सर्वोपरी सहकार्य आणि योजना मिळवून देण्यासाठी तत्पर आहोत.

सुदर्शन कंपनीचे प्रतिनिधी श्री. लटपटे यांनी हरभरा बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रॉयल शेतकरी गटाचे भगवान किर्दत व शिवराज कोळगीरे यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी विभागाचे गावात उल्लेखनीय कार्य असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक किशोर अडगळे यांनी करून झालेले कामे व करावयाच्या कामाबाबत माहिती दिली तर सूत्रसंचालन सतीश नारायणकर यांनी केले. रॉयल शेतकरी गटाचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आभार मानले. यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

(ॲग्रो विशेष)

रोहयो योजना ठरेल पूरक

रोहयो योजनेतून केळी लागवडीसाठी राडी गावचे शेतकरी जिल्ह्यात अग्रेसर ठरतील आणि गाव मॉडेल बनेल. अजून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. यासह प्रक्रीया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभऱ्याला हमीभावही नाही; सोयाबीन दर स्थिर, मक्याचे दर दबावात, तुरीचे दर घसरले तर संत्र्याची आवक मर्यादित

Sugarcane Crop Management: ऊस पिकातील चुका शोधण्याची गरज

Sangli Cane Crushing: सांगली जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांचे गाळप सुरू

Kolhapur News: कोल्हापुरातील कारखान्यांच्या वजनकाट्यांची आदेश नसताना तपासणी, बिंग फुटलं, नेमकं प्रकरण काय?

Paus Andaj: पावसाला पोषक हवामान; राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी

SCROLL FOR NEXT