Mumbai News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेद्वारे भरण्यात येणारी कृषी सेवेतील पदे वित्त विभागाच्या मान्यतेअभावी मागील दोन वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. कृषी विभागाने राज्यसेवा आयोगाकडे मे आणि डिसेंबर २०२५ मध्ये मागणी पत्र पाठवूनही वित्त विभागाने त्यास मान्यता दिलेली नाही. परिणामी, वयोमर्यादा ओलांडली जाण्याच्या भीतीने कृषी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. .कृषी विभागामध्ये २७५०२ पदे मंजूर आहेत. यातील १८२९८ पदे भरली असून तब्बल ९२०४ पदे रिक्त आहेत. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, अनुरेखक, वाहन चालक, नाईक, शिपाई, रोपमळा मदतनीस आदी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. वित्त विभागाच्या निर्देशानुसार यातील वाहन चालक पदे भरण्यास मनाई करण्यात आली आहे..Agriculture Department: कृषी अधिकाऱ्यांची विविध पदे दीर्घकाळापासून आहेत रिक्त.उर्वरित पदांचा आकृतिबंध अंतिम टप्प्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांचा आकृतिबंध अंतिम करण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेद्वारे कृषी उपसंचालक (गट अ)मधील तंत्र अधिकारी, आणि महाराष्ट्र कृषी सेवा (गट ब) कनिष्ठ संवर्ग, जिल्हा परिषद कृषी अधिकारी ( गट ब) आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा (गट ब) सहायक प्रशासकीय अधिकारी अशी पदे भरण्यात येतात..मे २०२५ मध्ये ८७ पदांचे मागणी पत्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यासाठी वित्त विभागाच्या उपसमितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पदांची जाहिरात २०२५ मध्ये प्रसिद्ध होऊन भरती होणे अपेक्षित होते. २०२६ मधील भरतीसाठी ४८४ पदांच्या मागणीसाठीही वित्त विभागाच्या उपसमितीकडे मागणी पत्र सादर केले गेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. त्याआधी जर या पदांना मान्यता मिळाली नाही. तर २०२६ ची कृषी सेवेच्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. त्यामुळे कृषी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे..Agriculture Department Funds: निधीसाठी केंद्राला साकडे.याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात मागील पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी संबंधित पदांचे मागणी पत्र वित्त विभागाला सादर केले आणि ते मान्यतेअभावी प्रलंबित असल्याचे सांगितले..वित्त विभागाकडे पाठविण्यात आलेली पदेमे २०२५महाराष्ट्र कृषी सेवा गट ब १५ पदेमहाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ ७२ पदेएकूण ८७.डिसेंबर २०२५महाराष्ट्र कृषी सेवा गट अ २४महाराष्ट्र कृषी सेवा गट ब ७८महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ १३७कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब २३६महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब ९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.