Banana Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Orchard : नगरमध्ये तयार केळी बागा वादळात उद्ध्वस्त

Suryakant Netke

Nagar News : पंधरा दिवस, महिनाभरात केळीची विक्री करायची होती. त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांशी बोलणेही सुरू होते. मात्र अचानक संकट आले. कसलाही मागमूस नसताना जोरदार वादळ आले.

वादळाने झाडांसह बहुतांश केळीची झाडे जागेवर मोडून पडली आणि तासभरातील वादळाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले. या भागात सुमारे सव्वाशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी बागा वादळाने मोडल्या आहेत.

शेवगाव तालुक्यातील रांजणी, दहिगावने, खामगाव, भावी निमगाव, मठाचीवाडी, दहिफळ, शहर टाकळी, घेवरी भागांतील शेतकऱ्यांची ही हतबलता त्रस्त करणारी आहे.

या भागात वादळाने नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादकांना सुमारे अडीच ते तीन कोटींचा फटका बसल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहे. नगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी, नेवासा भागातही काही ठिकाणी केळीला वादळाचा फटका बसला आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यांच्या पूर्व भागाला औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पाचा बॅकवॉटर आहे. त्यामुळे रांजणी, दहिगावने, खामगाव, भावी निमगाव, मठाचीवाडी, दहिफळ, शहर टाकळी, घेवरी आदी भागाला जायकवाडीचा आधार मिळत असल्याने वेगवेगळी पिके घेऊन शेतकरी शेतीत प्रयोग करतात.

केळीचे अनेक वर्षांपासून येथे पीक घेतले जाते. चार दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात अचानक पूर्वमोसमी पाऊस व वादळ झाले. पावसापेक्षा वादळच अधिक होते.

बहुतांश बागा ७० टक्क्यांपेक्षा अधिक मोडून पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने मदत करून केळी उत्पादकांना सावरण्याची गरज आहे, असे रांजणी येथील शेतकरी बाबासाहेब दत्तू माताडे, आबासाहेब माताडे, कैलास कर्डिले, अशोक दगडू उगले, ज्ञानेश्‍वर निवृत्ती गायके, भगवान भानुदास चव्हाण यांच्यासह अन्य नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

विमा मिळाला पाहिजे

शासनाने केळीचा पीकविम्यात समावेश करावा अशी मागणी दहिगावने (ता. शेवगाव) येथील सेवा सोसायटीचे अध्यक्ष व केळी उत्पादक शेतकरी बाळासाहेब मरकड, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, विलास लोखंडे यांच्यासह यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

आमच्या भागात शेतकरी सातत्याने वेगवेगळे शेतीचे प्रयोग करतात. केळीचे या भागात अनेक दिवसांपासून उत्पादन घेतले जाते. चार दिवसांपूर्वी अचानक आलेल्या वादळाने मात्र केळी उत्पादकांना उद्‌ध्वस्त केले आहे. बहुतांश केळीच्या बागा तासभरात मोडून पडल्या आणि हातातोंडाशी आलेला घास वाया गेला. उत्पादकांना मदत करण्याची गरज आहे.
काकासाहेब घुले, सरपंच, रांजनी, ता. शेवगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT