Banana crop insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : निधीअभावी केळी विमा परताव्यांना विलंब होण्याची शक्यता

Crop Insurance Compensation : २०२३-२४ या हंगामात फळ पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : राज्य शासनाचे अनुदान प्राप्त न झाल्याने हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ मध्ये केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या विमाधारकांना विमा परतावे किंवा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होईल, अशी स्थिती आहे. हे अनुदान शासनाने तत्काळ देऊन शेतकऱ्यांना परतावे वितरणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.

२०२३-२४ या हंगामात फळ पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे. या योजनेतून १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी केळी पिकास विमा संरक्षण देण्यात आले. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत पात्र केळी विमाधारकांना विमा परतावे किंवा नुकसान भरपाई देय असल्याचा नियम आहे.

हा विमा संरक्षण कालावधी संपून आता ३० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु परताव्यांबाबत शासनाकडून हालचाली दिसत नसल्याची स्थिती आहे. राज्य शासन या योजनेतून केळी पिकासाठी हेक्टरी २७ हजार ५०० रुपयांचा निधी विमा परतावा म्हणून देते.

तर १७ हजार रुपयांचा निधी केंद्र सरकार या योजनेत केळी पिकासाठी विमा परताव्यापोटी देते. राज्याकडून विमा परताव्यांपोटीचा निधी मात्र विमा कंपनीकडे जमा झालेला नाही. राज्याचा निधी आल्यानंतर केंद्र सरकार आपला निधी देते. परंतु राज्याकडूनच हा निधी न आल्याने विमा कंपनी हे परतावे शेतकऱ्यांना देण्यास बाध्य नाही.

निधी आल्यानंतर २१ दिवसांचा संकेत

राज्य शासनाचा निधी या योजनेसाठी प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी २१ दिवसांत परतावे पात्र केळी विमाधारकांच्या बँक खात्यात वर्ग करील, असाही संकेत या योजनेत आहे. यामुळे शासन केळी विमाधारकांना परताव्यांसाठी निधी देण्यास जेवढा विलंब करील, तेवढाच पुढे अधिकचा कालावधी परताव्यांना लागेल. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

यातच या योजनेबाबत २०२२-२३ मध्ये मोठा घोळ झाला. यामुळे परताव्यांबाबत आतापर्यंत तक्रारी, नाराजी, चौकशी असा प्रकार सुरू आहे. असा प्रकार यंदा न करता शेतकऱ्यांना वेळेत परतावे दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

विमा परतावे वेळेत केळी विमाधारकांना मिळत नाही. पुढे निवडणुका व अन्य धामधुमीत केळी उत्पादक, केळी विमाधारकांना वाऱ्यावर सोडू नये. पुढील काही दिवसांत हे परतावे केळी विमाधारकांना दिले जावेत. २०२२-२३ मध्ये जसा घोळ व विलंब झाला, तसा आता टाळावा, अशी अपेक्षा आहे.
- रोहित पाटील, केळी विमाधारक, कठोरा, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT