Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेतील कर्जदार शेतकऱ्यांचा टक्का वाढेना

Agriculture Insurance : सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतरही या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढू शकलेली नाही.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Amravati News : सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतरही या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढू शकलेली नाही. विशेषतः कर्जदार शेतकऱ्यांसाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिल्यानंतरही हा टक्का वाढू शकला नाही. ३१ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधीत केवळ ९६ कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्राने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली असून राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपया प्रीमियम भरून विमा काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. प्रीमियमची उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकार भरत आहे. त्यामुळे विमा प्रीमियमचा भार कमी झाला असला तरी शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Crop Insurance Scheme
Fake Crop Insurance : कांद्याचा पावणेदोन लाख हेक्टरवर बोगस पीकविमा

जिल्ह्यातील २ लाख ३१ हजार ३१२ शेतकऱ्यांनी विमा काढला असून त्यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची केवळ ४ हजार १५० प्रकरणे दाखल झाली आहेत. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची ४ लाख ७० हजार ४७५ प्रकरणे आहेत.

कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेतील सहभाग वाढावा, यासाठी या योजनेची मुदत २५ ऑगस्टपर्यंत वाढविली होती. या मुदतीत शेतकऱ्यांनी बॅंकेत जाऊन विमा काढायचा होता. त्यास मात्र अपेक्षेनुरूप प्रतिसाद मिळालेला नाही. मुदतवाढीच्या कालावधीत केवळ ९६ शेतकऱ्यांनी विमा काढला.

Crop Insurance Scheme
Crop Insurance : परभणी जिल्ह्यातील सोयाबीनचे प्रलंबित पीकविमा दावे अदा करा

त्यामुळे या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांचा टक्का मात्र वाढू शकला नाही. ३१ जुलैला या योजनेतील कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ५४ इतकी होती. मुदतवाढीनंतर ती ४ हजार १५० झाली, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची ४ लाख ७० हजार ४७५ प्रकरणे दाखल झाली आहेत.

पीकविम्याची जिल्ह्यातील स्थिती

एकूण सहभागी शेतकरी २, ३१, ३१२

कर्जदार प्रकरणे ४, १५९

बिगर कर्जदार प्रकरणे ४, ७०, ४७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com